जगभरातून थोडक्यात आणि सुटसुटीत बातम्या

जगभरातून थोडक्यात आणि सुटसुटीत बातम्या

विमानातून समुद्रात उडी मारण्याची धमकी

एअर इंडिया एक्प्रेसच्या दुबई-मंगळुरू विमान प्रवासात केरळमधील एका प्रवाशाने समुद्रात उडी मारण्याची धमकी देत क्रू मेंबर्ससोबत गैरवर्तन केले. या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. मुहम्मद बीसी असे या प्रवाशाचे नाव असून त्याने उडत्या विमानात अचानक गोंधळ घालण्यास सुरुवात केला. त्यामुळे विमानातील इतर प्रवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. एअर इंडिया एक्स्प्रेसचे सुरक्षा समन्वयक सिद्धार्थ दास यांनी प्रवाशाविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर विमान मंगळुरू येथे उतरल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱयांनी मुहम्मदला ताब्यात घेतले.

10 वर्षांत स्पेस सेक्टर 83 हजार कोटींचे

पुढच्या दहा वर्षांत हिंदुस्थानी स्पेस सेक्टर तब्बल 9 ते 10 बिलीयन डॉलर म्हणजेच 83 हजार कोटी रुपयांची इंडस्ट्री बनेल असा दावा हिंदुस्थानी अंतराळ संशोधन पेंद्राचे प्रमुख एस सोमनाथ यांनी केला आहे. सध्या ही इंडस्ट्री 2 बिलियन डॉलरची असल्याची असल्याचे त्यांनी सांगितले. एसएफओ टोक्नॉलॉजीच्या  कार्बन रिडक्शन इनीशिएटिव्ह कार्यक्रमात सोमनाथ यांनी याबाबत सांगितले. खासगी क्षेत्रातील 400 पंपन्या इस्रोच्या तंत्रज्ञानाचा फायदा आपल्या मिशनमध्ये करत असल्याचे त्यांनी सांगितले.

 कामी रीता शेर्पा पुन्हा एव्हरेस्टवीर

नेपाळचे दिग्गज गिर्यारोहक कामी रीता शेर्पा यांनी रविवारी जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट 29 व्या खेपेतही सर करत एव्हरेस्टवरील सर्वाधिक चढाईचा विक्रम मोडीत काढला. सेव्हन समिट ट्रेक्सने आयोजित केलेल्या या मोहीमेत 20 गिर्यारोहक होते. 54 वर्षीय शेर्पा यांनी 1994 मध्ये पहिल्यांदा एव्हरेस्टवर चढाई केली होती. गेल्या वर्षी त्यांनी 27 व्या आणि 28 व्यांदा असे दोनवेळा एव्हरेस्ट सर केले होते.

 नुडल्स खाणे बेतले जिवावर

उत्तर प्रदेशच्या पीलभीतमध्ये नूडल्स खाणे एका 7 वर्षांच्या मुलाच्या जिवावर बेतल्याची घटना घडली. कुटुंबातील पाच जण आजारी पडले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. राहुल कुमार असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

30 दिवसांचा नोटीस पीरियड!

एचडीएफसी बँकेने नोकरी सोडणाऱया कर्मचाऱयांसाठी नोटीस पीरियड 90 ऐवजी आता 30 दिवसांचा केला आहे. कर्मचाऱयांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला. कर्मचाऱयांना आधीपेक्षा चांगले नियोजन करता यावे, हा उद्देश असल्याचे एचडीएफसीच्या वरिष्ठ अधिकार्याने स्पष्ट केले. बँकेने 6 मे रोजी कर्मचाऱयांना ईमेल करून एचआर धोरणात बदल झाल्याचे
सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;