निळ्या रंगाचा झिंगा!

निळ्या रंगाचा झिंगा!

ब्रिटनच्या दक्षिण कोर्निश समुद्रकिनारी निळ्या रंगाचा  झिंगा (ब्ल्यू लॉबस्टर) सापडला आहे. अत्यंत दुर्मीळ असा मासा सापडल्याने सगळे चकीत झाले आहेत. एका मच्छिमाराच्या जाळ्यात तो सापडला. मच्छिमाराने दिलेल्या माहितीनुसार, त्याची बोट  15 ते 18 फूट खोल पाण्यात होती, त्यावेळी त्याला जाळ्यात हा अनोखा ंिझगा दिसला. साधारणपणे करडय़ा किंवा लाल रंगाचे झिंगा असतात. मात्र असा निळा झिंगा कधी पाहिला नाही, असे वयाच्या 11 व्या वर्षापासून मासेमारी करणार्या क्रिस पुके यांनी सांगितले.

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या जैवविज्ञान तज्ञांच्या मते निळा झिंगा पकडण्याची शक्यता 20 लाखात एक असते. या अतिदुर्मीळ झिंग्याला सुरक्षेसाठी मत्स्यालयात ठेवण्यात आलंय. दुसऱया जाळ्यात अडकू नये किंवा अन्य मासे त्याला खातील, म्हणून ही खबरदारी घेण्यात आलेय.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;