सावधान! ‘शूगर फ्री’च्या पॅकींगवरील लेबल फसवे

सावधान! ‘शूगर फ्री’च्या पॅकींगवरील लेबल फसवे

 

शरीरातील साखर नियंत्रणात राहावी यासाठी, अनेकजण शूगर फ्री उत्पादने खरेदी करतात. पण,  या उत्पादनांचे सेवन करणेही शरीरासाठी घातक ठरू शकते. कारण, या उत्पादनांत फॅट असू शकते असे आयसीएमआर अर्थात इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने म्हटले आहे. ज्या उत्पादनांवर पॅकींगवर शुगर फ्री असा दावा केलेला असतो. परंतु, पॅकींगवरील माहिती नीट वाचून घेतली पाहिजे, जेणेकरून आपल्या आरोग्यासाठी उत्तम उत्पादने खरेदी करता येतील असेही आयसीएमआरने म्हटले आहे.

शुगर फ्री उत्पादनांमध्ये फॅटचे प्रमाण अधिक असू शकते तर पॅक फ्रूट ज्यूसमध्ये 10 टक्के फ्रूट पल्प असतो. शुगर फ्री असल्याचा दावा करणारी उत्पादने आकर्षक पॅकाRगमध्ये दिली जातात. मात्र, अशी उत्पादने ग्राहकांना केवळ आकर्षित करतात. त्यांच्या पॅकाRगवर दिलेली माहिती अनेकदा भ्रामक असू शकते असा इशाराही आयसीएमआरने दिला आहे.

पॅकींगवर नैसर्गिक असा शब्द जाणुनबूजन लिहिला जातो. परंतु, हा शब्द भ्रामक असून प्रत्यक्षात उत्पादनात एक किंवा दोनच नैसर्गिक घटक असतात असा दावा हैदराबाद स्थित नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ न्यूट्रिशनने केला आहे.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ न्यूट्रिशनने म्हटले आहे की, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाच्या मानकांनुसार उत्पादनात 10 टक्के फळांचा रस असेल तरच उत्पादनांवर नैसर्गिक असे लिहिले जाऊ शकते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;