मी प्रिती झिंटाच्या बॉयफ्रेंडला..; ‘दिल चाहता है’ फेम अभिनेत्रीचं बऱ्याच वर्षांनंतर स्पष्टीकरण

मी प्रिती झिंटाच्या बॉयफ्रेंडला..; ‘दिल चाहता है’ फेम अभिनेत्रीचं बऱ्याच वर्षांनंतर स्पष्टीकरण

‘दिल चाहता है’ या चित्रपटात अभिनेता सैफ अली खानच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारलेली अभिनेत्री सुचित्रा पिल्लई सध्या ‘ब्रोकन न्यूज 2’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याआधी तिने बऱ्याच मालिकांमध्येही काम केलंय. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुचित्रा तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. सुचित्रावर एकेकाळी अभिनेत्री प्रिती झिंटाचा बॉयफ्रेंड चोरल्याचा आरोप झाला होता. त्या चर्चांवरही तिने प्रतिक्रिया दिली आहे.

आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत सुचित्राने स्पष्ट केलं की तिचा पती लार्स केजेल्डसन याने आधी प्रिती झिंटाला डेट केलं होतं. मात्र त्या दोघांचं ब्रेकअप तिच्यामुळे झालं नव्हतं. ‘बॉयफ्रेंड स्नॅचर’चा ठपका लावल्याप्रकरणी ती म्हणाली, “प्रिती आणि मी कधीच एकमेकांच्या मैत्रिणी नव्हतो. आम्ही एकमेकांना ओळखत होतो, कारण आमच्या दोघांचा एक मित्र कॉमन होता. पण हे खरंय की माझ्या पतीने तिला डेट केलं होतं. त्या दोघांचं नातं फार कमी वेळेसाठी होतं. लार्स मला भेटण्याआधीच त्या दोघांचा ब्रेकअप झाला होता. सत्य हेच आहे की मी त्या दोघांमध्ये आली नव्हती. ते दोघं वेगळ्या कारणामुळे एकमेकांपासून दूर गेले होते”, असं तिने सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Preity G Zinta (@realpz)

सुचित्राने तिच्या खासगी आयुष्यातील आणखी एका घटनेचा उल्लेख या मुलाखतीत केला, जेव्हा ती इंग्लंडहून परतली होती आणि अँड्र्यू कॉइनला डेट करत होती. अँड्र्यू हा स्टार टीव्हीशी जोडला गेला होता. त्यावेळी मॉडेल अचला सचदेवसोबत त्याचं ब्रेकअप झालं होतं आणि यासाठी सुचित्रालाच दोषी ठरवलं गेलं होतं. मात्र अँड्र्यू आणि अचलाचं ब्रेकअप माझ्यामुळे झालंच नव्हतं, असं आता सुचित्राने स्पष्ट केलं आहे. नंतर या बातम्या वाचून अचलासोबत हसल्याचंही तिने सांगितलं.

प्रिती झिंटाने 2016 मध्ये जीन गुडइनफ याच्याशी लॉस एंजिलिसमध्ये लग्न केलं. 2021 मध्ये सरोगसीद्वारे या दोघांना जुळी मुलं झाली. तर सुचित्राने 2005 मध्ये लार्सशी लग्न केलं. या दोघांना एक मुलगी आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;