नगर, शिर्डीत मतदानाला सुरुवात; अनेक ठिकाणी मतदारांचा निरुत्साह, मोबाईल बंदीमुळे गोंधळ

नगर, शिर्डीत मतदानाला सुरुवात; अनेक ठिकाणी मतदारांचा निरुत्साह, मोबाईल बंदीमुळे गोंधळ

नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी मतदारांचा निरुत्साह दिसून आला. काही ठिकाणी मतदारांना आपले नाव यादीत नसल्याचे आढळून आले. त्यामुळे मतदान केंद्रावर गोंधळ उडाला होता. काही मतदान केंद्रावर सकाळपासून थोडीफार उपस्थिती होती पण प्रशासनाने मोबाईलबाबतच्या निर्णयामुळे अनेकजण माघारी परतले. ग्रामीण भागामध्ये तर सकाळपासूनच निरुत्साह काही ठिकाणी दिसून आला.

नगर जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होण्यासाठी जनजागृती केली आहे. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मतदान केंद्राच्या बाहेर काही ठिकाणी मंडप घालण्यात आले होते. पण त्या ठिकाणी बसण्यासाठी कोणीच उपलब्ध नव्हते, अशी स्थिती दिसून आली. अनेकांना मतदानाच्या स्लीप या मिळाल्या नव्हत्या, त्यामुळे आपले केंद्र कोठे आहे आणि आपले मतदार यादीत नाव आहे की नाही याबाबतही गोंधळ निर्माण झाला होता. मतदान केंद्राच्या आवारामध्ये मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कोणालाही आत मध्ये मोबाईल नेता आला नाही. या निर्णयाच्या कडक अंमलबजावणीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;