राजस्थानमधील एमडी फॅक्टरीचा पर्दाफाश; मुंबई पोलिसांची धडक कारवाई
साकीनाका पोलिसांनी राजस्थान येथील ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी कारवाई करून 110 कोटींचे ड्रग्ज आणि ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. याप्रकरणी हुकुमाराम चौधरी आणि प्रशांत पाटीलला अटक केली. प्रशांत हा शास्त्रज्ञ असून त्याने एमडी बनवण्यासाठी या टोळीला फॉर्मुला दिला होता. उस्मानाबाद येथे एमडीची फॅक्टरीचा प्लांटनंतर त्याने चार महिन्यापूर्वी राजस्थान येथे एमडीचा प्लांट टाकला होता.
गेल्या वर्षी सराफराज शेखला एमडी तस्करी प्रकरणी साकीनाका पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एमडी जप्त केले होते. त्याच्या चौकशीत अब्दुलचे नाव समोर आले. त्याला पोलिसांनी पश्चिम बंगाल आणि मजीदला पवई येथून अटक केली होती. त्या तिघांच्या चौकशीत पोलिसांना महत्वपूर्ण माहिती मिळाली. ते ड्रग पुण्यावरून आले होते. वरिष्ठ निरीक्षक गबाजी चिमटे याच्या पथकातील सहायक निरीक्षक मैत्रानंद खंदारे, उप निरीक्षक पंकज परदेशी, पवार, बाठे, जाधव, कारंडे, आदी पथकाने तपास सुरु केला. पोलिसांनी पुण्याहून प्रशांत पाटीलला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली. एका फरार आरोपीच्या सांगण्यावरून त्याने राजस्थानच्या जोधपूर येथील मोगरा खुर्दमधील जागेत एमडीचा चार महिन्यापूर्वी प्लांट टाकला होता. हुकुमारामने प्लांट टाकण्यासाठी तो जागा दिली होती. तसेच त्याने एका गोदामात एमडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य लपवून ठेवले होते. पोलिसांनी कारवाई अॅल्युमिनियम क्लोराईड,40 बॉटल्स ब्रोमिन, 280 किलो वजनाचे क्लोरोफॉम लिक्वीड आणि 67. 5 किलो एमडी जप्त केले.
झटपट पैशासाठी दिला फॉर्म्युला
प्रशांतने बीएसइ केमिस्ट्री शिक्षण घेतले आहे. पूर्वी तो महाड येथील एका एमआयडीसीत काम करायचा. तिथे त्याची ओळख फरार आरोपीसोबत झाली. फरार आरोपीने प्रशांतला पैशाचे आमिष दिले. त्यानंतर प्रशांतने उस्मानाबाद येथे पहिला ड्रगचा कारखाना सुरु केला. सहा महिने प्रशांत ने ड्रग बाबत रिसर्च देखील केले होते. रिसर्च यशस्वी झाल्यावरच चार महिन्यापूर्वी त्याने राजस्थान येथे तो कारखाना सुरू केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List