ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे निधन
अनेक मालिका, चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांनी आज एका कार्यक्रमादरम्यान रंगमंचावरच अखेरची एक्झिट घेतल्यामुळे सिने-नाटय़सृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.
अभिनेते आणि दिग्दर्शक राजेश देशपांडे यांच्या सृजन द क्रिएशन या संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिन सोहळ्यात सतीश जोशी हे देखील सहभागी झाले होते. सृजनोत्सव या रंगमंचीय आविष्कारात त्यांनी एक भूमिकाही सादर केली. हा सोहळा सुरू असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि स्टेजवरच त्यांचे निधन झाले.
अनेक मराठी मालिकांमध्ये सतीश जोशी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. झी मराठी वाहिनीवरील भाग्यलक्ष्मी या मालिकेतीली त्यांची भूमिका विशेष गाजली होती. त्यांनी अनेक मराठी मालिकांमध्ये वडिलांच्या भूमिका केल्या होत्या. दिग्दर्शक वीरेंद्र प्रधान यांच्या मालिकांमध्ये ते हमखास असायचे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List