कोस्टल रोडची मेचीही डेडलाइन हुकणार; अडीच हजार मेट्रिक टन वजनाचा दुसरा गर्डर आज होणार लाँच

कोस्टल रोडची मेचीही डेडलाइन हुकणार; अडीच हजार मेट्रिक टन वजनाचा दुसरा गर्डर आज होणार लाँच

मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडची मे 2024 ची डेडलाईन आता पुन्हा हुकणार आहे. आता हा सागरी मार्ग जून अखेरपर्यंत प्रवासी सेवेत येणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली. दरम्यान, हरयाणा अंबाला येथून अडीच हजार मेट्रिक टन वजनाचा ‘बो स्ट्रिंग आर्च गर्डर’ कोस्टल रोडच्या ठिकाणी दाखल झाला असून सोमवारी पहाटे बसवण्यात येणार आहे.

कोस्टल रोडची वरळी ते मरीन ड्राइव्हदरम्यानची एक मार्गिका 12 मार्चला वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे तर संपूर्ण कोस्टल रोड मे अखेरपर्यंत प्रवासी सेवेत येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र आता संपूर्ण कोस्टल रोड जून अखेरपर्यंत प्रवासी सेवेत येणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. दरम्यान, कोस्टल रोडचे 28 एप्रिलपर्यंत 88.17 टक्के काम पूर्ण झाले असून अजून 12 टक्के काम पूर्ण होणे बाकी आहे. उर्वरित कामात दुसरा 2 हजार 500 मेट्रिक टन वजनाचा बो स्ट्रिंग आर्च गर्डर समुद्रात बसवणे हे मोठे आव्हानात्मक काम आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;