चौथ्या टप्प्यातील मतदानावरही उष्णतेच्या लाटेचे सावट

चौथ्या टप्प्यातील मतदानावरही उष्णतेच्या लाटेचे सावट

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यांप्रमाणे उद्या होणाऱया चौथ्या टप्प्यातील मतदानावरही उष्णतेच्या लाटेचे सावट कायम आहे. नंदुरबार, जळगाव, रावेरमधील तापमान उद्या 41 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्याने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या अहवालात वर्तवली आहे. त्याचबरोबर बहुतांश मतदारसंघात दुपारी व संध्याकाळी गडगडाटासह पावसाच्या सरींची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

राज्यात सध्या उष्णतेची लाट आहे. उष्णतेच्या लाटेमुळे पहिल्या तीन टप्प्यांतील मतदानावर परिणाम झाल्याचे सांगितले गेले. रखरखत्या उन्हामुळे दुपारच्या वेळेत मतदान कमी झाले. उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर मतदार मतदानासाठी बाहेर पडले. त्यामुळे संध्याकाळी पाचच्यानंतर मतदान पेंद्रांबाहेर रांगा लागल्याचे अनेक भागात दिसून आले. आता चौथ्या टप्प्यातही उष्णतेच्या लाटेचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

– उन्हात बराच काळ बाहेर राहू नका, भरपूर पाणी प्या, पावसात विजा चमकत असतील आणि गडगडाट होत असेल तर झाडे किंवा शेडच्या खाली आसरा घेऊ नका अशा सूचना हवामान खात्याने जारी केल्या आहेत. उष्णतेच्या लाटेची शक्यता गृहित धरून निवडणूक आयोगानेही विविध उपाय योजले आहेत. मेघगर्जनेसह पाऊस असल्यास त्या काळात इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल वस्तूंचा वीजपुरवठा खंडित करण्याची सूचना हवामान खात्याने केली आहे.

ढगाळलेले आकाश आणि पावसाच्या सरी

या 11 मतदारसंघांपैकी काही मतदारसंघांत पावसाची शक्यताही आहे. आकाश काही अंशी ढगाळलेले राहील. काही ठिकाणी वादळी वाऱयाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवेतील आर्द्रताही वाढण्याची शक्यता आहे.

 

मतदारसंघ आणि सरासरी तापमान

   नंदुरबार       39 ते 41 अंश से.

   जळगाव        39 ते 41 अंश से.

   रावेर            39 ते 41 अंश से.

   जालना         37 ते 39 अंश से.

   संभाजीनगर 37 ते 39 अंश से.

   मावळ          35 ते 37 अंश से.

   पुणे              35 ते 37 अंश से.

   शिरुर           35 ते 37 अंश से.

   नगर            35 ते 37 अंश से.

   शिर्डी           38 ते 40 अंश से.

   बीड             38 ते 40 अंश से.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;