राजकीय हेतूनेच तृणमूलच्या नेत्यांविरोधात कट रचला; रेखा शर्मा आणि भाजप नेत्यांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

राजकीय हेतूनेच तृणमूलच्या नेत्यांविरोधात कट रचला; रेखा शर्मा आणि भाजप नेत्यांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

पश्चिम बंगालमधील निर्देष आणि भोळ्याभाबडय़ा महिलांवर दबाव आणून तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना गोवण्यासाठीच तसेच राजकीय हेतूने त्यांच्याविरोधात गुन्हेगारी कट रचण्यात आल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. याप्रकरणी तृणमूलच्या नेत्यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा आणि भाजप नेते पीयाली दास यांच्यासह विविध नेत्यांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यता आली आहे.

निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्यात आले असून रेखा शर्मा आणि दास यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. संदेशखलीतील भोळ्याभाबडय़ा महिलांची तसेच मतदारांची फसवणूक करणे, गुन्हेगारी कट रचणे, भ्रष्टाचार असे गंभीर स्वरुपाचे अपराध केल्याचे पत्रात नमुद करण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी हे पत्र निवडणूक आयोगाला लिहीले आहे.

 

व्हिडीओमुळे प्रकरणाला नवे वळण?

संदेशखली लैंगिक अत्याचार प्रकरणाला एका व्हीडियोमुळे नवे वळण लागले. राजकारणात एकच खळबळ उडाली. या व्हिडीओत भाजपाचे स्थानिक नेते गंगाधर कयाल अज्ञात लोकांसमोर संदेशखली प्रकरण खोटे असल्याचा दावा करताना दिसत आहेत. भाजपा नेत्यांनीच संदेशखली आंदोलन पुकारले होते. पैशांच्या बदल्यात महिलांना तृणमूल नेत्यांविरोधात बलात्काराची खोटी तक्रार दाखल करण्यास सांगितले होते, अशी कबुली देताना दिसत आहेत.

महिलेचा काय होता व्हिडीओ?

एका महिलेचा व्हिडिओ तृणमुल काँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन यांनी एक्सवरून शेअर केला होता. रेखा शर्मा आणि पियाली दास यांनी धमकी देऊन दबाव आणून कोऱया कागदावर सह्या करण्यास भाग पाडल्याचा दावा महिलेने केला होता. बलात्कारप्रकरणी तक्रारकर्ता उभा करण्यात आल्याचे  नंतर उघड झाले. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांविरोधात बलात्काराची खोटी तक्रार करण्यासाठी दबाव आणल्याचा आणि पैसे दिल्याचा आरोप महिलेने केला होता. त्यानंतर आणखी एका महिलेने बलात्काराची तक्रार मागे घेतली होती.

महिलांवर दबाव आणि धमक्या

संदेशखलीतील एका महिलेची मुलाखतच डेरेक ओ ब्रायन यांनी  शेअर केली होती. या मुलाखतीवरूनच स्पष्ट होते की, महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा, भाजपा नेता पियाली दास यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनी मिळून राजकीय फायद्यासाठी संदेशखलीतील निर्देष आणि भोळ्याभाबडय़ा महिलांवर दबाव आणला आणि त्यांना धमक्या दिल्या. तसेच तृणमुल काँग्रेसच्या नेत्यांविरोधात तक्रार करण्यासाठी भाग पाडले, अशाप्रकारे भाजपा नेत्यांनी फसवणूक, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी कट रचण्यासारखे अपराध केल्याचे डेरेक ओ ब्रायन यांनी पत्रात म्हटले आहे.

भाजपा, तृणमूलचे कार्यकर्ते भिडले

संदेशखलीमध्ये रविवारी भाजपा आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. महिलांना पैसे देऊन बलात्काराची खोटी तक्रार करण्यास भाग पाडण्यात आल्यामुळे चिडलेल्या काही महिलांनी भाजपाच्या कार्यकर्त्याला मारहाण केली. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते सुकुमार यांनी खुलना परिसरात भाजपाचे कार्यकर्ते आले आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांना मारहाण सुरू केल्याचा आरोप केला. भाजपाचा डाव उघड झाल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते सैरभर झाल्याचे ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;