मुंबई महानगरपालिकेला विजेतेपद; एमसीए एफ डिव्हिजनमध्ये कॉर्पोरेट ट्रॉफी जिंकली

मुंबई महानगरपालिकेला विजेतेपद; एमसीए एफ डिव्हिजनमध्ये कॉर्पोरेट ट्रॉफी जिंकली

मुंबई महानगरपालिका स्पोर्ट्स क्लबने एमसीए कॉर्पोरेट ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या ‘एफ’ डिव्हिजनचे विजेतेपद पटकाविले. एमसीए मैदान, बीकेसी येथे फ्लडलाइट्सखाली खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात शनिवारी त्यांनी बेस्ट स्पोर्ट्स क्लबचा 24 धावांनी पराभव केला.

प्रथम फलंदाजी करताना मुंबई महानगरपालिकेने 20 षटकांत 8 बाद 139 धावा केल्या तर बेस्ट स्पोर्ट्स क्लबला प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान पेलवले नाही. मधल्या फळीतील फलंदाज नीलेश खरमाळे (42 धावा) वगळता त्यांच्या प्रमुख फलंदाजांनी निराशा केली. संक्षिप्त धावफलक ‘एफ’ डिव्हिजन (अंतिम फेरी) ः मुंबई म्युनिसिपल स्पोर्ट्स क्लब20 षटकांत 8 बाद 139 (अभिजित गावडे 25, धीरज सोळंकी 25, हृषिकेश पाटकर 22, रवी शिंदे 22; महेश नाईक 2/22, डी.एस. गर्जे 2/28) वि. बेस्ट स्पोर्ट्स क्लब 20 षटकांत 8 बाद115 (नीलेश खरमाळे 42, देवराज गायकवाड 19; योगेश्वर कडू 2/6, धीरज सोलंकी 2/37).

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;