राज ठाकरे परप्रांतीयांच्या लोंढय़ांवर बोलताच मिंध्यांना टेन्शन
ठाण्याची बजबजपुरी झाली आहे. तलावांचे शहर आता टँकरचे शहर झाले आहे. त्यासाठी परप्रांतीयांचे लोंढे थांबवावेच लागतील. तरच विकासाला अर्थ आहे. हे बोजे आता आवरा अन्यथा कितीही विकास केला तरी ठाणेकरांच्या हाती काही लागणार नाही, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सांगितले. मिंधे गटाच्या उमेदवारांसाठी कळवा येथे झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी ऐन निवडणुकीच्या धामधुमीत परप्रांतीयांचे लोंढे आवरण्याची भूमिका मांडल्याने मिंधे गटाला टेन्शन आले आहे. त्यांच्या या भाषणामुळे उत्तर भारतीयांमध्ये मिंधे गटाविरोधात नाराजीचा सूर उमटल्याची चर्चा होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List