महाराष्ट्रातील 11 जागांवर आज मतदान, शिवसेनेचे चार शिलेदार मैदानात

महाराष्ट्रातील 11 जागांवर आज मतदान, शिवसेनेचे चार शिलेदार मैदानात

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात उद्या महाराष्ट्रातील 11 जागांसह देशभरातील 96 मतदारसंघांत मतदान होणार असून त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. या टप्प्यात जळगावमधून करण पवार-पाटील, छत्रपती संभाजीनगरातून चंद्रकांत खैरे, मावळमधून संजोग वाघेरे पाटील आणि शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे असे शिवसेनेचे चार शिलेदार निवडणुकीच्या आखाडय़ात मशाल हाती घेऊन उतरले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, नगर, शिर्डी, बीड या मतदारसंघांत मतदान होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीची भक्कम एकजूट पाहायला मिळाली असून नंदुरबारमध्ये काँग्रेसचे गोवाल पाडवी, रावेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीराम पाटील, जालन्यात काँग्रेसचे कल्याण काळे, पुण्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, शिरुरमध्ये राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे, नगरमध्ये राष्ट्रवादीचे नीलेश लंके आणि बीडमध्ये राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे नशीब आजमावत आहेत.

सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही मतदानाची वेळ असून चौथ्या टप्प्यात 11 मतदारसंघांत 298 उमेदवार निवडणुकीच्या आखाडय़ात उतरले आहेत.
बीड मतदारसंघात सर्वात जास्त उमेदवार लढत आहेत. येथे 41 उमेदवार असून सर्वात कमी 11 उमेदवार नंदुरबार मतदारसंघात आहेत.
लोकसभेच्या 543 जागांपैकी तिसऱया टप्प्यापर्यंत 284 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडली आहे. चौथ्या टप्प्यानंतर 380 मतदारसंघांतील मतदान पूर्ण होईल. त्यानंतर पुढच्या तीन टप्प्यांत 163 जागी मतदान होणार आहे.

आंध्र प्रदेशात विधानसभेसाठी होणार मतदान
आंध्र प्रदेशात लोकसभेच्या सर्व 25 जागांसोबतच विधानसभेच्या सर्व 175 जागांसाठीही मतदान होणार आहे.

देशातील 96 मतदारसंघांत होणार मतदान
चौथ्या टप्प्यात देशातील 10 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील 96 जागांवर मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील 11, आंध्र प्रदेशातील 25, बिहारमधील 5, झारखंडमधील 4, मध्य प्रदेशातील 8, ओडिशातील 4, तेलंगणातील 17, उत्तर प्रदेशातील 13, पश्चिम बंगालमधील 8, जम्मू-कश्मीरमधील एका जागेचा यात समावेश आहे. या टप्प्यात 1,717 उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;