फिरकीवीरांना सन्मान देणे शरमेची बाब नव्हे; वीरूने रोहित-सूर्याला खडसावले

फिरकीवीरांना सन्मान देणे शरमेची बाब नव्हे; वीरूने रोहित-सूर्याला खडसावले

कोलकाता – फिरकीवीरांच्या चांगल्या चेंडूंना सन्मान देणे ही शरमेची बाब नाही. त्यांना सन्मान दिलात तर तुम्ही त्यांच्या कमकुवत चेंडूंना पह्डून काढण्यासाठी खेळपट्टीवर उभे राहू शकाल. फलंदाजांनी खेळपट्टीवर फलंदाजीला येताना आपला अहंकार बाजूला ठेवून मैदानात उतरायला हवे, अशी खडे बोल हिंदुस्थानचा आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवागने मुंबई इंडियन्सचे स्टार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवला सुनावले.

मुंबई इंडियन्सला कोलकात्याविरुद्ध विजयाची नामी संधी होती. फक्त रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवने थोडे संयमाने खेळायला हवे होते आणि आपली विकेट फेकायला नको होती, असे सेहवागचे म्हणणे होते. रोहितने आपली विकेट स्वस्तात फेकल्यामुळे मुंबईला आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे वीरू रोहितच्या फलंदाजीवर चांगलाच संतापला होता. जर एक फलंदाज एका गोलंदाजाचा आदर ठेवू शकत नसेल तर किमान त्याच्या चांगल्या चेंडूंचा तरी आदर ठेवायलाच हवा. रोहित आणि सूर्याने फिरकीच्या चांगल्या चेंडूंना खेळून काढले असते तर ते नक्कीच खेळपट्टीवर टिकले असते आणि सामना मुंबईच्या खिशात असता.

 

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;