ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे निधन

मराठी मालिकाविश्वातून लोकप्रिय झालेले ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन झालं आहे. रंगभूमीवरच त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. सृजन द क्रिएशन या संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सतीश जोशी सहभागी झाले होते. कार्यक्रम सुरू असतानाच स्टेजवर कोसळून त्यांचं निधन झालं.

जोशी यांचे मित्र राजेश देशपांडे यांनी सोशल मीडियावर त्यांच्या निधनाविषयीची पोस्ट शेअर केली आहे. आमचे ज्येष्ठ मित्र अभिनेते सतीश जोशी यांचे आज रंगोत्सवात स्टेजवरच दुःखद निधन झाले. जाण्यापूर्वीही ते अभिनय करत होते, असं देशपांडे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

झी मराठी वाहिनीवरील भाग्यलक्ष्मी ही त्यांची गाजलेली मालिका. अनेक मालिकांमधून त्यांच्या वडिलांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;