मजुर नेणारे वाहन उलटले; 27 मजुर जखमी
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील सोनेगाव स्मशानभूमीजवळ मजुर नेणारे वाहन अनियंत्रित झाल्याने शेतबांधित उलटले. यात वाहनातील 27 मजुर जखमी झाले तर त्यातील 14 मजुरांवर उपचार सुरू आहेत. तसेच 2 जण गंभिर जखमी झाले आहेत. य मजुरांना जिल्हारूग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमी मजुर हे अड्याळजवळील नेरला येथील असून सोनेगाव येथे धान कापणीला जात होते.
जिल्ह्यात सर्वत्र उन्हाळी धान कापणी धडाक्यात सुरू आहे. शेतकरी हार्वेस्टर व मजुरांच्या सहाय्याने धान कापणी उरकून घेत आहेत. धान कापणीला मजुर मिळत नसल्याने दूरवरून वाहनाने मजुर नेऊन शेतीची कामे उरकून घेत आहेत. अड्याळ जवळील नेरला येथील २७ मजुर हे धान कापणीकरीता टाटाएस या वाहनाने नेरला येथून सोनेगाव येथे नेत असताना सोनेगाव स्मशानभूमीजवळ वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन अनियंत्रित होवून उलटले. त्यात वाहनातील २७ मजुर जखमी झाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List