तेलुगु आणि कन्नड अभिनेत्रीचे अपघाती निधन
तेलुगू टेलिव्हिजन मालिका ‘त्रिनयणी’मध्ये तिलोत्तमाची भूमिका साकारणारी अभिनेत्री पवित्रा जयराम हिचे रविवारी रस्ता अपघातात निधन झाले आहे. आंध्र प्रदेशमधील मेहबूबनगर परिसराजवळ भयंकर कार अपघात घडला. यावेळी हैदराबादहून वानापर्थीकडे येणारी बस आणि कारची जोरदार धडक झाली. यात पवित्राच्या कारचे नियंत्रण सुटले आणि कार डिव्हायडरला धडकली. कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील हनाकेरे येथे परतत असताना हा अपघात झाला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घटनेत पवित्राचा चुलत बहिण अपेक्षा, ड्रायव्हर श्रीकांत आणि अभिनेता चंद्रकांत गंभीर जखमी झाले आहेत. तर अभिनेत्री पवित्रा जयरामचे या अपघातात निधन झाले. अभिनेत्रीच्या निधनामुळे संपूर्ण मनोरंजन क्षेत्र हादरले आहे. पवित्राच्या निधनावर इंडस्ट्रीतील अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List