पाकव्याप्त काश्मीरमध्ये युद्धजन्य परिस्थिती; महागाईविरोधात नागरिक रस्त्यावर

पाकव्याप्त काश्मीरमध्ये युद्धजन्य परिस्थिती; महागाईविरोधात नागरिक रस्त्यावर

पाकव्याप्त काश्मीरमध्ये विजेचे वाढणारे दर आणि पिठाच्या किमतींवरून प्रचंड वाद सुरू आहे. त्यामुळे तेथील सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींविरोधात निदर्शने करणाऱ्या सुरक्षा दल आणि आंदोलकांमध्ये गदारोळ सुरु आहे. आंदोलकांनी दगडफेक आणि बाटल्यांचा मारा सुरू केल्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच हवेत गोळीबार करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र या चकमकीत एक पोलीस अधिकारी शहीद झाला तर 100 हून अधिक लोक जखमी झाले. जखमींमध्ये बहुतांश लोक पोलीस आहेत.

वीज आणि पिठाच्या किमतीत वाढ झाल्याने गदारोळ

वीज आणि पिठाच्या किमती वाढल्यानंतर पाकव्याप्त कश्मिरात नागरिकांचा संयम सुटला आहे. JAAC विजेच्या वाढलेल्या किमती, गव्हाच्या पिठावर सबसिडी आणि उच्चभ्रू वर्गाचे विशेषाधिकार बंद करण्याची मागणी करत आहे. निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर, रविवारी भिंबर आणि बाग शहरांसह पीओकेच्या विविध भागांमध्ये मोबाइल फोन आणि इंटरनेट सेवा निलंबित करण्यात आल्या. मुझफ्फराबाद, धोड्याल, कोटली आदी भागात गेल्या दोन दिवसांपासून जनजीवन ठप्प झाले आहे. अनेक ठिकाणी नागरिकांचे चक्का जाम आंदोलन सुरू आहे. दरम्यान, पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी सोमवारी राष्ट्रपती भवनात प्रदेशातील परिस्थितीशी संबंधित तातडीची बैठक बोलावली आहे.

मिरपूरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) कामरान अली म्हणाले की, पीओकेमध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमक झाली. हा वाद नियंत्रणात आणणे कठीण आहे. तेथील संपूर्ण जनता रस्त्यावर उतरली आहे. यावेळी हे प्रकरण आटोक्यात आणण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. आंदोलकांनी दगडफेक आणि बाटल्या फेकल्यानंतर काही भागात पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच हवेत गोळीबार केला. दरम्यान इस्लामगढ शहराचे उपनिरीक्षक अदनान कुरेशी यांच्या छातीत गोळी लागली आणि त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, पीओकेचे पंतप्रधान चौधरी अन्वारुल हक म्हणाले की, मीरपूरमध्ये हिंसक निदर्शने झाल्यानंतर एक अधिकारी ठार झाला असून 70 हून अधिक जखमी झाले आहेत. सरकार वीज आणि गव्हाच्या पिठाच्या किमतीत सवलत देण्यास तयार आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी सर्व जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक मेळावे, रॅली आणि मिरवणुकांवर बंदी घातली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;