मार्की येथे वीज पडून बैल जोडी ठार , शेतकऱ्यावर ओढवले संकट

मार्की येथे वीज पडून बैल जोडी ठार , शेतकऱ्यावर ओढवले संकट

>> प्रसाद नायगावकर

गेल्या दोन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस कोसळतोय. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे . यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील मार्की (बु.) येथील श्री.दिवाकर रामदास ढेंगळे यांच्या शेतात वीज कोसळून दोन बैल ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

दिवाकर यांचे शेत शिवारात आहे. अचानक ढग काळवंडून आल्याने पावसाच्या दृष्टीने झाडाचा आसरा घेण्यासाठी लिंबाच्या झाडाखाली त्यांनीं आपली बैलजोडी बांधून ठेवली. अशातच सोसाट्याच्या वाऱ्याने रौद्ररूप धारण केले व विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. झाडाखाली बांधून असलेल्या बैलावर अचानक वीज पडली आणि या बैलजोडीचा जागेवरच मृत्यू झाला .सध्या शेतीच्या मशागतीच्या कामाला वेग आला आहे.अश्यातच बैल जोडी गेल्याने दिवाकर यांच्यासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. जिवापाड प्रेम असणारी ही बैलाची जोडी मृत्यमुखी पडल्याने त्यांना शोक अनावर झाला आहे .

राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे असणार आहेत. हवामान विभागाने मध्य विदर्भाला अवकाळीसह गारपिटीचा आणि उर्वरित भागात अवकाळी पावसासाठी पिवळा आणि नारंगी इशारा दिला आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात आणखीनच भर पडली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;