माझीच चूक होती, माझ्यामुळे..; मुलीच्या पहिल्या घटस्फोटाविषयी असं का म्हणाल्या नीना गुप्ता?
अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता लवकरच आई होणार आहे. मसाबाने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात अभिनेता सत्यदीप मिश्राशी दुसरं लग्न केलं. याआधी तिने निर्माता मधू मंटेनाशी पहिलं लग्न केलं होतं. आता नुकत्यात दिलेल्या एका मुलाखतीत नीना गुप्ता यांनी मुलीचं पहिलं लग्न अपयशी ठरण्यामागचं सांगितलं आहे.
"मी सांगते, माझी चूक काय होती. जेव्हा मसाबाचं लग्न झालं होतं, तेव्हा तिला खरंतर लग्न करण्याची इच्छा नव्हती. तिला तिच्या पहिल्या पतीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचं होतं. मात्र त्यावेळी कुठेतरी माझी आईची भूमिका मध्ये आली", असं त्यांनी सांगितलं.
याविषयी त्या पुढे म्हणाल्या, "मी तिला म्हटलं की नाही.. तू त्याच्यासोबत लग्न केल्याशिवाय एकत्र राहू शकत नाही. माझी खरी चूक तीच होती. ते दोघं माझ्यामुळेच विभक्त झाले. मी खूप निराश झाले होते. पण दोघांमध्ये जर जमलं नाही तर आपण तरी काय करू शकतो."
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List