निलंगा तालुक्यातील तांबाळा येथे जुगारावर धाड; 60 पेक्षा जास्तजण ताब्यात, मुद्देमाल जप्त
निलंगा तालुक्यातील सिमावर्ती भागातील मौजे तांबाळा येथे सुरू असलेल्या जुगारावर शनिवारी रात्री पोलिसांनी धाड टाकली. सिमावर्ती कर्नाटक भागातील अनेकजण जुगार खेळण्यासाठी याठिकाणी आले होते. येथे धाड टाकत पोलिसांनी सुमारे 60 जणांना ताब्यात घेतले आहे. रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, वाहने, गुटखा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
निलंगा तालुक्यातील सिमावर्ती भागातील तांबाळा येथे शनिवारी रात्री द ब्रिक्स कार्ड स्पोर्टस क्लब येथे पोलिसांनी धाड टाकली. त्यामध्ये परराज्यातील अनेकजण रोख रकमेने जुगार खेळत असल्याचे दिसून आले. तेथे प्रतिबंध असलेले गुटख्यासारखे पदार्थ आढळून आल्यामुळे अनेक लोकांवर कारवाई करण्यात आली. धाड टाकलेल्या ठिकाणाहून रोख रक्कम, मोबाईल जप्त करण्यात आली. सुमारे 60 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List