काका पवन कल्याणसाठी प्रचार करणं रामचरणला पडलं महागात; झाली धक्काबुक्की तर काहींनी खेचला शर्ट

काका पवन कल्याणसाठी प्रचार करणं रामचरणला पडलं महागात; झाली धक्काबुक्की तर काहींनी खेचला शर्ट

साऊथ सुपरस्टार रामचरणचे काका पवन कल्याण हे आंध्रप्रदेशमधील पीठापुरम मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. पवन कल्याण हे मेगास्टार चिरंजीवीचे भाऊ आणि जनसेना पक्षाचे संस्थापक आहेत. त्यांच्या प्रचारासाठी अभिनेता रामचरण रविवारी पीठापुरम याठिकाणी पोहोचला होता. मात्र रामचरणची एक झलक पाहण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली. यावेळी काही चाहत्यांनी रामचरणचा शर्टही खेचण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रामचरणचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारासाठी तो सर्वसामान्यांमध्ये पोहोचला, तेव्हा तुफान गर्दी झाली.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये रामचरणला चाहत्यांच्या गर्दीने घेरल्याचं पहायला मिळत आहे. त्या गर्दीतून बाहेर पडण्याचा पुरेपूर प्रयत्न तो करतोय. मात्र अशातच आजूबाजूचे चाहते त्याचा शर्टसुद्धा खेचतात. काहीजण त्या गर्दीतही मोबाइल काढून रामचरणसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतात. अशातच त्याला लोकांच्या धक्काबुक्कीचाही सामना करावा लागतो. रामचरणच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘हे खूप वाईट आहे. स्टारडमच्या बदल्यात अशी किंमत चुकवावी लागते का? त्यांचा काहीच आदर नाही का’, असं एकाने लिहिलं. तर ‘रामचरणच्या अवतीभवती पुरेशी सुरक्षाव्यवस्था हवी होती’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

दुसरीकडे रामचरणचा काका पवन कल्याण यांचा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मोठा चाहतावर्ग आहे. 2008 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 2014 मध्ये त्यांनी जनसेना पार्टीची स्थापना केली. पवन कल्याण हे मेगास्टार चिरंजीवी यांचे लहान भाऊ आहेत. भावाच्या पक्षासाठी चिरंजीवी यांनीसुद्धा जनतेला आवाहन केलं होतं. “माझा छोटा भाऊ लोकांच्या सेवेसाठी आपल्या पैशांचा वापर करत आहे. त्याच्यावर तुमचा आशीर्वाद कायम राहू द्या”, असं ते म्हणाले होते.

पवन कल्याण यांनी नुकत्याच एका रॅलीदरम्यान अभिनेता शाहरुख खानचा उल्लेख केला होता. “पैशांसाठी मी कधीच माझ्या मूल्यांशी तडजोड करत नाही”, असं ते म्हणाले होते. एका जाहिरातीसाठी शाहरुख खानपेक्षा जास्त पैशांची ऑफर मला मिळाली होती, मात्र जनहिताचा विचार करून मी ती नाकारली, असा खुलासा पवन कल्याण यांनी रॅलीमध्ये केला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;