आता तिच्याबद्दल बोलण्यासारखं काही शिल्लक नाही; विक्रमादित्य सिंह यांचा कंगनाला टोला

आता तिच्याबद्दल बोलण्यासारखं काही शिल्लक नाही; विक्रमादित्य सिंह यांचा कंगनाला टोला

हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघ यंदा राजकीय आकर्षण ठरत आहे. या मतदारसंघाबाबतही चर्चा होत आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांची लढत भाजपची उमेदवार अभिनेत्री कंगना राणावतशी होत आहे. या निवडणुकीत मंडी मतदारसंघासाठी विक्रमादित्य सिंह यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर ही निवडणूक कंगनालानी कठीण असल्याचे स्पष्ट झाले होते. आता कंगनाच्या बोलघेवडेपणावर बोट ठेवत विक्रमादित्य सिंह यांनी कंगनाला जबरदस्त टोला लगावला आहे. अभिनेत्री कंगना स्वतःबद्दल इतके बोलते की, आता तिच्याबद्दल बोलण्यासारखं काही शिल्लक नाही, असा टोला विक्रमादित्य सिंह यांनी लगावला.

कंगना स्पीतीमध्ये का आली नाही आणि रेकॉन्ग पीओमधून परत का गेली, असा सवाल विक्रमादित्य यांनी केला. तसेच कंगनाने दलाई लामांविरोधात केलेल्या विधानांमुळे तिचे काळे झेंडे दाखवून स्वागत केले जाईल या भीतीनेच ती स्पितीमध्ये आली नाही, असेही विक्रमादित्य म्हणाले. कंगना कधी म्हणते की, देशाला 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळाले, तर कधी म्हणते सुभाषचंद्र बोस देशाचे पहिले पंतप्रधान होते. आता ती म्हणत आहे की, अमिताभ बच्चन यांच्यानंतर ती एकमेव कलाकार आहे ज्यांना देशभरातील लोक ओळखतात, त्यामुळे ती आता स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहे, असेही विक्रमादित्य म्हणाले.

जनतेच्या समस्या जाणून घेण्याऐवजी कंगना स्वतःचीच स्तुती करत फिरत आहे. तसेच जनता समस्या मांडण्यासाठी मुंबईला धाव घेणार आहे का, मंडीमध्ये संकट आले, त्यावेळी कंगना कोठे होती, असे सवाालही विक्रमादित्य यांनी याआधी केले होते. तर आता तिच्या स्वतःचीच प्रशंसा करण्यावरून विक्रमादित्य यांनी कंगनाला चांगलाच टोला लगावला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;