भर दुपारी अंधारून आलं, किल्लारी परिसरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस
पावसाळा सुरू होण्यास अद्याप अवकाश असला तरी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस पडतोय. रविवारी दुपारी लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील मौजे किल्लारी परिसरात अचानक अंधारून आले आणि त्यानंतर वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस सुरू झाला. यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र लहान मुलांनी या पावसात भिजण्याचा आनंद लुटला. पावसामुळे वाढलेल्या तापमानाचा टक्काही घसरला आहे.
लातूर जिल्ह्यात 11 आणि 12 मे रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला होता. हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला असून रविवारी दुपारी दीडच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. काही भागामध्ये गाराही पडल्याचे वृत्त आहे. पावसाला सुरुवात होण्यापूर्वी सर्वत्र अंधारून आले होते. त्यानंतर वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List