…म्हणूनच राहुल गांधी अमेठीतून निवडणुकीच्या रिंगणात नाहीत; अशोक गेहलोत यांनी सांगितले कारण

…म्हणूनच राहुल गांधी अमेठीतून निवडणुकीच्या रिंगणात नाहीत; अशोक गेहलोत यांनी सांगितले कारण

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील अमेठी या मतदारसंघाची नेहमीच चर्चा असते. अनेक वर्षांपासून अमेठी मतदारसंघ काँग्रेसचा बालोकिल्ला मानला जातो. मात्र, गेल्या निवडणुकीत भाजपच्या स्मृती इराणी यांनी या मतदारसंघात विजय मिळवला आहे. या निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी अमेठीतून पुन्हा निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, काँग्रेसने राहुल गांधी यांच्यासाठी रायबरेलीची जागा निवडली आणि अमेठीत स्मृती इराणी यांच्या विरोधात के.एल. शर्मा यांना उमेदवारी दिली. काँग्रेस बालेकिल्ला समजत असलेल्या अमेठीतून राहुल गांधी स्मृती इराणींविरोधात निवडणूक का लढवत नाही, असा सवाल भाजपने केला आहे. त्याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

के. एल. शर्मा हे 40 वर्षांपासून काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. तेच अमेठीत भाजपच्या स्मृती इराणी यांचा पराभव करू शकतात, त्यामुळे राहुल गांधींना अमेठीतून निवडणूक लढवण्याची गरज नाही. हा पक्षाचा निर्णय आहे. अमेठीत भाजपशी मुकाबला करण्यास के.एल. शर्माच सक्षम आहेत. त्यामुळे राहुल गांधी यावेळी अमेठीतून निवडणुकीच्या रिंगणात नाहीत, असे गेहलोत म्हणाले. राहुल गांधीं यांनी रायबरेलीतून निवडणूक लढवावी, अशी पक्षाची इच्छा आहे. ते रायबरेलीच्या जागेवरूनही विजयी होतील.

शर्मा यांच्यासारखा गांधी परिवाराच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा व्यक्तीच अमेठीत भाजपविरोधात उमेदवार आहे. अमेठीत शर्माच विरोधकांशी सामना करण्यासाठी सक्षम आहेत. जनतेचे एकणारे शर्मा आहेत. ते जनतेचे ऐकतात आणि जनतेसाठी आवाज उठवतात. शर्मा सक्रिय झाल्यानंतर लोकांचे ऐकले जात आहे, असे गेहलोत यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;