‘बुलेट’ बनवणाऱ्या कंपनीचा ‘रॉयल’ परतावा; 4 वर्षात पैसे चौपट, आता प्रत्येक शेअरवर देणार 51 रुपये डिव्हीडंट

‘बुलेट’ बनवणाऱ्या कंपनीचा ‘रॉयल’ परतावा; 4 वर्षात पैसे चौपट, आता प्रत्येक शेअरवर देणार 51 रुपये डिव्हीडंट

दुचाकी घ्यायची म्हटले की प्रत्येकाचे पहिले प्रेम असते ती बुलेट. काळ बदलत गेला तरी बाजारपेठेत बुलेटचे वलय कमी झालेले नाही. अर्थात बुलेट घेणे आणि त्याचे वजन पेलणे प्रत्येकालाच शक्य होत नाही. मात्र हीच बुलेट बनवणाऱ्या कंपनीने गुंतवणूकदारांचे खिसे चांगलेच भरले आहेत.

आयशर मोटर ही कंपनी बुलेट बनवते. या कंपनीने प्रत्येक शेअरमागे 51 रुपयांचा डिव्हीडंट देण्याची घोषणा केली आहे. चौथ्या तिमाहीत झालेल्या चांगल्या फायद्यानंतर कंपनीने याची घोषणा केली. यामुळे गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे.

आयशर मोटरच्या नफ्यामध्ये 18 टक्के वाढ झाली असून 31 मार्च 2024 च्या तिमाही समाप्तीपर्यंत हा नफा 1070 कोटींवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच काळात कंपनीला 906 कोटी नफा झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत यात 12 टक्के वाढ झाली आहे. कंपनीच्या या नफ्यात बुलेट विक्रीचाही मोठा वाटा आहे. रॉयल एनफिल्डच्या विक्रीमध्ये आर्थिक वर्षामध्ये 9 टक्के वाढ झाली आहे. यामुळे कंपनीने चांगल्या डिव्हीडंटची घोषणा केली.

1 रुपये ते 4600 रुपये

आयशर मोटरच्या तिमाही निकालाचा परिणाम सोमवारी शेअर बाजार उघडल्यावरही दिसू शकतो. गेल्या आठव्यात अखेरच्या दिवशी हा शेअर 2.32 टक्क्यांनी वाढला होता आणि 101.95 रुपयांच्या वाढीसह 4670 रुपयांवर पोहोचला होता. विशेष म्हणजे 1 जानेवारी 1999 मध्ये या शेअरची किंमत अवघी एक रुपये होती. मात्र 25 वर्षांमध्ये या कंपनीने गुंतवणूकदारांना 4 हजार 500 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

चार वर्षात पैसे चौपट झाले

आयशर मोटर या कंपनीचे भाग भांडवल 1.28 लाख कोटींवर पोहोचले आहे. गत पाच वर्षातील कामगिरीवर नजर टाकल्यास, या कंपनीने गेल्या एक वर्षात 30 टक्के, तर पाच वर्षात 123 टक्के परतावा दिला आहे. गेल्या 4 वर्षांचा विचार केल्यास या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे चौपट केले आहेत. एप्रिल 2020 मध्ये या सेअरची किंमत 1268 रुपयांपर्यंत खाली आली होती. मात्र त्यानंतर हा शेअर 4700 रुपयांवर पोहोचला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;