महिला न्यायाधीशांच्या संख्येत वाढ

महिला न्यायाधीशांच्या संख्येत वाढ

हिंदुस्थानात गेल्या पाच वर्षांत महिला न्यायाधीशांच्या संख्येत वाढ झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ‘स्टेट ऑफ द ज्युडिशियरी’च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. 2018 मध्ये महिला न्यायाधीशांची संख्या 27 टक्के होती ती 2023 मध्ये 34.6 टक्के झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयात 2023 पर्यंत 32 न्यायाधीशांपैकी केवळ तीन महिला न्यायाधीश होत्या, तर उच्च न्यायालयात 696 न्यायाधीशांपैकी केवळ 10 टक्के महिला न्यायाधीश होत्या. पंजाब आणि हरयाणा, दिल्ली आणि मुंबई हायकोर्टात सर्वाधिक अनुक्रमे 13, 10 आणि 9 आहेत, तर ओडिशा, झारखंड आणि छत्तीसगड उच्च न्यायालयात महिला न्यायाधीशांची संख्या सर्वात कमी आहे. पटणा, उत्तराखंड, त्रिपुरा, मेघालय आणि मणिपूर न्यायालयात एकही महिला न्यायाधीश नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;