आता ते सगळ्यांना डोस देत सुटलेत, लोकशाहीत एवढा माज कसला दाखवता? जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवारांवर निशाणा

आता ते सगळ्यांना डोस देत सुटलेत, लोकशाहीत एवढा माज कसला दाखवता? जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवारांवर निशाणा

अजित पवार यांनी बारामतीमध्ये दिलेल्या धमक्या तसेच विरोधी पक्षांच्या उमेदवारांना तू जिंकून कसा येतो, असा इशारा देण्याच्या घटना राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. या मुद्द्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवार आता सगळ्यांना डोस देत सुटलेत. तुला पाडीन, तुला पाडीन करतायेत, विरोधी पक्षाच्या उमेदवाराला तुम्ही निवडून कसे येता, तेच बघतो, अशी धमकी देत आहेत. त्यांच्यात एवढी ताकद आहे तर मग तुमच्या पोराला निवडून का आणला नाही? लोकशाहीत एवढा माज कसला दाखवता, असा सवाल करत आव्हाड यांनी अजित पवार यांना लक्ष्य केले.

1991 साली अजित पवारांना महाराष्ट्रात कोण ओळखत होते, अजित पवारांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि संसदेत पाठवले. त्यानंतर सातत्याने सत्तेच्या वर्तुळात ठेवले. ४ वेळा उपमुख्यमंत्री बनवले. तुम्हाला केवळ सत्ता हवी होती. त्या सत्तेसाठी तुम्ही शरद पवारांनी त्यांनी स्थापन केलेला पक्ष ताब्यात घेतला, असा आरोपही आव्हाड यांनी केला. ज्या मातोश्रीने आईसारखे प्रेम दिले, भरभरून सर्वकाही दिले, त्यांनीच मातोश्री फोडण्याचे काम केले. ही दोन्ही गद्दारी महाराष्ट्राला कधी आवडणार नाही. या नवीन सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडेंना या निवडणुकीत कायमचे संपवून टाका, येणाऱ्या कुठल्याच निवडणुकीत जागा देऊ नका, असा हल्लाबोलही आव्हाड यांनी केला.

आम्हाला संविधान टिकवायचे आहे, भाजपाला संविधानच मान्य नाही. नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले, त्यावेळी पत्रकात पुरोगामी शब्दच गायब करण्यात आला. अनेक खासदारांनी प्रश्न विचारला तेव्हा चुकून प्रिंटिंग मिस्टेक झाली असे ते म्हणाले. धर्मनिरपेक्षता हा शब्द संविधानातून भाजपाला वगळायचा होता. आम्ही मेलो तरी देशाचे संविधान बदलू देणार नाही. ही लढाई संविधानाची आहे. निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशी ठाण्यात लढाई आहे, असेही आव्हाड म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;