20 वर्षांनंतर सौर वादळ पृथ्वीवर धडकले! आकाशात दिसल्या रंगीबेरंगी छटा

20 वर्षांनंतर सौर वादळ पृथ्वीवर धडकले! आकाशात दिसल्या रंगीबेरंगी छटा

जगातील सर्वात शक्तिशाली सौर वादळ 20 वर्षांनंतर शुक्रवारी पृथ्वीवर धडकले. या वादळामुळे टास्मानियापासून ब्रिटनपर्यंत आकाशात जोरदार विजा चमकत होत्या. यामुळे उपग्रह आणि पॉवर ग्रीडचेही नुकसान झाले. सौर वादळामुळे जगातील अनेक ठिकाणी अरोराच्या घटनाही पाहायला मिळाल्या. या वेळी सौर वादळामुळे आकाशात वेगवेगळय़ा रंगांच्या छटा उमटल्या. काही ठिकाणी आकाश हे रंगीबेरंगी दिसत होते. हे पाहण्यासाठी अनेक ठिकाणी लोकांनी गर्दी केली होती. ‘नॅशनल ओशनिक अँड ऍटमॉस्फेरिक ऍडमिनिस्ट्रेशन’ (एनओएए) या अमेरिकन वैज्ञानिक संस्थेच्या म्हणण्यानुसार, या सौर वादळाचा प्रभाव आठवडय़ाच्या शेवटपर्यंत राहील. हे प्रामुख्याने जगाच्या उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील भागात पाहिले जाऊ शकते, पण जर ते मजबूत असेल तर ते इतर अनेक ठिकाणी दिसून येते. जगभरातील सॅटेलाईट
ऑपरेटर, एअरलाईन्स आणि पॉवर ग्रीड ऑपरेटर सतर्क आहेत.

सौर वादळ ऑक्टोबर 2003 च्या हॅलोवीन  स्टॉर्मनंतरचे दुसरे मोठे वादळ आहे. हॅलोविन वादळामुळे स्वीडनमध्ये ब्लॅकआऊट झाले होते. वादळामुळे दक्षिण आफ्रिकेत ग्रीडस् विस्कळीत झाले होते.

आकाशात दिसले अद्भुत दृश्य

सौर वादळे हे सूर्यापासून कोरोनल मास इंजेक्शनमुळे होतात. सूर्याकडून येणारे कण पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात प्रवेश करतात. कण पृथ्वीवर प्रवेश केल्यानंतर एक प्रतिक्रिया उमटते, ज्यामुळे कण चमकदार रंगीबेरंगी दिवे म्हणून दिसतात. सौर वादळांचा पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्रावर परिणाम होतो. यामुळे नासा आपल्या अंतराळवीरांना वादळाच्या वेळी अंतराळ स्थानकाच्या आत राहण्याचा सल्ला देतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;