मुंबईसह कोकणात अवकाळी पावसाची शक्यता; विदर्भ, मराठवाड्यात गारपीटीचा अंदाज

मुंबईसह कोकणात अवकाळी पावसाची शक्यता; विदर्भ, मराठवाड्यात गारपीटीचा अंदाज

राज्यात उन्हाचे चटके बसत असताना अनेक जिल्ह्यात पारा 40 अंशांवर गेल्याने उकाडा असह्य होत आहे. त्यातच आता वातावरणात बदल झाल्याने मुंबईसह कोकणात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसासही काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यातील बहुतांश भागात उन्हाचा चढता पारा कायम आहे. आता काही जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये पुढील पाच दिवस पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. मुंबईत आर्द्रता वाढल्याने असह्य उकाडा जाणवत आहे. रात्रीही असह्य उकाडा जाणवत आहे. उत्तरेकडून येणारे कोरडे आणि समुद्रावरील बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे मुंबई, ठाणे आणि पालघर भागांत पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पुढील पाच दिवस विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. वातावरणातील बदल आणि वाढलेली आर्द्रता आणि समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे यामुळे राज्यात अवकाळी राऊस आणि गारपीटीचे वातावरण तयार झाले आहे. पुढील पाच दिवस विदर्भ, मराठवाडा, खान्देश व पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात वादळ, गारपीटी होण्याची शक्यता आहे. मुंबई, उपनगरासह कोकणातील ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;