रशियन सैन्य युक्रेनमध्ये घुसले

रशियन सैन्य युक्रेनमध्ये घुसले

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाने आता नवीन वळण घेतले आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये दोन वर्षांहून अधिक काळ युद्ध सुरू असून रशियन सैन्य युक्रेनच्या खार्किवमध्ये एक किलोमीटर घुसले आहे. खुद्द युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. खार्किवमधून लोकांना बाहेर काढण्याचे आदेश लष्कराला दिले आहेत. खार्किवमध्ये तैनात करण्यासाठी युक्रेनने सर्व राखीव सैनिकांनाही परत बोलावले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या सैन्याला युद्ध मोहिमेला अधिक तीव्र करण्याचे आणि अण्वस्त्रांच्या हल्ल्यांचा सराव करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर रशियन सैनिकांनी युद्धात आपली व्याप्ती वाढवली आहे. खार्किव हे रशियन सैन्यासाठी महत्त्वाचे आहे. कारण 2022 मध्ये रशियन लष्कराला येथे पराभवाचा सामना करावा लागला होता.

अमेरिकेची युक्रेनला पुन्हा मदत

युक्रेनच्या मदतीसाठी अमेरिका पुन्हा धावली आहे. अमेरिकेने युक्रेनला युद्धासाठी 400 मिलियन डॉलरची मदत जाहीर केली. नव्या सैन्य मदतीच्या पॅकेजमध्ये पॅट्रियट वायू संरक्षण युद्ध साहित्य, स्टिंगर ऍण्टिएअरक्राफ्ट मिसाईलचा समावेश आहे. युक्रेनवर होणारे हवाई हल्ले रोखण्यात मदत मिळणार आहे. अमेरिकेकडून आतापर्यंत 61 अब्ज डॉलरच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;