Mega Block Update – हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक रद्द, मध्य रेल्वेची माहिती

Mega Block Update – हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक रद्द, मध्य रेल्वेची माहिती

हार्बर मार्गावरील नियोजित मेगा ब्लॉक रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. मध्य रेल्वेने दुपारी 11च्या सुमारास ट्विट करून ही माहिती दिली. यामुळे रविवारी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी हार्बर मार्गावर घेण्यात येणारा मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. अब आणि डाऊन मार्गावरील लोकल रविवारच्या वेळापत्रकानुसार चालतील. मात्र ट्रान्स हार्बर मार्गावर दुपारी 11.30 ते 14.30 पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. नवीन वेळापत्रक जाणून घेऊन प्रवाशांनी या मार्गावर प्रवास करावा असे आवाहन मध्य रेल्वेने केले.

असा होता नियोजित मेगाब्लॉक?

हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी अप आणि डाउन मार्गावर रविवारी सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार होता. या कालावधीत वाशी, बेलापूर, पनवेल येथून सुटणाऱ्या सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून वाशी/पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार होत्या. मात्र आता हा मेगा ब्ल़ॉक रद्द करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;