जगभरातून थोडक्यात आणि सुटसुटीत बातम्या
दिल्लीत धुळीचे वादळ
दिल्ली-एनसीआरमध्ये धुळीचे वादळ आले. यात झाड अंगावर पडून दोघांचा मृत्यू झाला आहे. वादळामुळे अनेक इमारतींचेही नुकसान झाले. वादळामुळे झालेल्या विविध अपघातांत एकूण 23 जण जखमी झाले आहेत. रस्त्यावर झाडे पडल्याने दिल्ली आणि परिसरातील वाहतुकीवरही परिणाम झाला.
केट मिडलटन यांच्या प्रकृतीत सुधारणा
ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स विल्यम्स यांनी आपली पत्नी केट मिडलटन यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. केट यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे प्रिन्स यांनी म्हटले आहे. प्रिंसेस ऑफ वेल्स केट मिडलटन सध्या कॅन्सरग्रस्त असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोकेमॉन कार्डस्ची 57 लाखांना विक्री
1990 पासून पोकेमॉन कार्डस् सांभाळून ठेवल्यानंतर 24 वर्षानंतर या कार्डस्ची एका लिलावात विक्री करण्यात आली. या कार्डस्ला 57 लाख रुपयांना खरेदी करण्यात आले. 2407 कार्डस् कलेक्शनचा लिलाव करण्यात आला. 10 हजार युरोपासून सुरू झालेली बोली 55 हजार
युरोपर्यंत गेली.
पाकिस्तानची आता खैर नाही!
पहिले हर्मीस-900 स्टारलाइनर ड्रोन लवकरच हिंदुस्थानच्या ताफ्यात दाखल होणार आहे. यामुळे आता पाकिस्तानची खैर नाही. या ड्रोनची हिंदुस्थानी सीमेवर पाळत ठेवण्यास मदत होणार आहे. लष्कराला मिळणारे हे पहिलेच ड्रोन आहे. हे ड्रोन बनवण्यासाठी अदानी डिफेन्सने ड्रोन तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणासाठी इस्रायली कंपनी एल्बिटशी करार केला होता.
कुवेतची संसद बरखास्त
कुवेतचे नवे अमीर शेख मिशाल अल-अहमद अल-सबाह यांनी देशाची संसद बरखास्त करत असल्याची घोषणा केली. संसद बरखास्त केल्यानंतर नॅशनल असेंब्लीचे सर्व अधिकार अमीर आणि देशाच्या मंत्रिमंडळाकडे आले आहेत. येत्या 13 मे रोजी संसदेची प्रथमच बैठक होणार होती. पण त्याआधीच संसद बरखास्त करण्यात आली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List