पुस्तकाच्या शीर्षकात ‘बायबल’ नावाचा वापर; करिना कपूरला हायकोर्टाची नोटीस
अभिनेत्री करिना कपूर-खानला मध्य प्रदेश हायकोर्टाने नोटीस पाठवली आहे. न्यायमूर्ती गुरपाल सिंह अहलुवालिया यांच्या खंडपीठाने ही नोटीस पाठवली आहे. करिना कपूरने जुलै 2021 मध्ये ‘करिना कपूर खान्स प्रेगेन्सी बायबल’ या नावाचे पुस्तक लॉन्च केले होते. मध्य प्रदेशातील जबलपूर येथील वकील क्रिस्टोफर एन्थनी यांनी पुस्तकाच्या शीर्षकाला बायबल शब्द वापरल्याने आक्षेप घेत हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेनंतर हायकोर्टाने करिनाला नोटीस पाठवली. या पुस्तकाच्या शीर्षकाला बायबल नाव देण्यात आल्याने ईसाई समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. 1 जुलैला या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.
सवंग प्रसिद्धीसाठी नावाचा वापर
याचिकाकर्त्याने दावा केला आहे की, करिना कपूरने सवंग लोकप्रियता मिळावी यासाठी आपल्या पुस्तकाच्या शीर्षकामध्ये बायबलचा वापर जाणीवपूर्वक केला आहे, असे म्हटले आहे. या पुस्तकावर तत्काळ बंदी घालावी, अशी मागणीही याचिकाकर्त्याने हायकोर्टाकडे केली आहे. कोर्टाने करिना कपूरसोबत पुस्तक विक्रेत्यालाही नोटीस पाठवली आहे.
काय आहे पुस्तकात?
करिनाचे ‘करिना कपूर खान्स प्रेग्नसी बायबल’ पुस्तक 2021 मध्ये लॉन्च करण्यात आले. या पुस्तकात करिनाने आपल्या प्रेगन्सी प्रवासाबद्दल माहिती दिली आहे. तसेच आई होणाऱया महिलांना मुलांची कशी काळजी घ्यायची यासंबंधी सविस्तर माहिती दिली आहे. बाळंतपणानंतर डाएट, फिटनेस, स्वतःची काळजी, नवजात बाळांची कशी काळजी घ्यावी यासंबंधी टिप्स आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List