…तर आता कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघाल; अमोल कोल्हेंनी अजित पवारांना दिले थेट आव्हान

…तर आता कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघाल; अमोल कोल्हेंनी अजित पवारांना दिले थेट आव्हान

अजून विधानसभा बाकी आहे, करारा जबाब मिलेगा. आतापर्यंत आज्ञाधारक अमोल कोल्हे बघितला, आता कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघाल, असे थेट आव्हान महाविकास आघाडीचे शिरूर येथील उमेदवार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना दिले आहे. शिवसिंहाची औलाद आहे, थांबणार नाही, असेही ते म्हणाले. जेव्हा एक भूमिका घ्यायची वेळ आली होती, तेव्हा स्वार्थासाठी सरपटणाऱ्यांच्या रांगेत जायचे नाही हे आपण ठरवले होते, असेही कोल्हे म्हणाले.

दादा आपसे बैर नहीं, लेकीन बीजेपी की खैर नही, असेही कोल्हे यांनी सांगितले. भाजपने आमचा अपेक्षाभंग केला त्यांची तळी तुम्ही उचलत आहात, असेही कोल्हे यांनी अजित पवार यांना सुनावले. राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला माझ्या मतदारसंघात 12 सभा घ्याव्या लागत असतील तर हा माझा गौरव आहे. माझे काम बोलते, म्हणून त्यांना इथे यावे लागले. दादांना आपण विनम्रतेने सांगत आहोत, मांजर सुद्धा कोंडून मारायचा प्रयत्न केला, तर तो प्रतिहल्ला करते. मी तर शिवसिंहाची औलाद आहे, थांबणार नाही, अजून विधानसभा बाकी आहे करारा जबाब मिलेगा. आतापर्यंत आज्ञाधारक अमोल कोल्हे बघितला,तर आता कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघाल, याची तयारी ठेवा, असे आव्हानही कोल्हे यांनी अजित पवार यांना दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;