आज वादळी पावसाचे धुमशान; मुंबई, ठाणे, रायगडात ऍलर्ट!
मुंबई, ठाणे आणि रायगड या भागांत रविवारी मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये अनेक भागांत रविवारपासून पाऊस आणि वादळाची शक्यता आहे. ही स्थिती मंगळवारपर्यंत असण्याची शक्यता आहे. या आठवडय़ाच्या शेवटी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
रविवारपासून मध्य महाराष्ट्र, घाट आणि दक्षिण कोकण विभागातील अनेक जिह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाटय़ाचा वारा वाहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळतील. मुंबईच्या पूर्वेला बदलापूर, कर्जत, कल्याण-डोंबिवली, पनवेलसारख्या भागांत वादळी वाऱयाची शक्यता आहे. रविवारपासून मुंबईसह उपनगरात वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विकेंडला 25 ते 28 डिग्री सेल्सियसपर्यंत तापमान असू शकते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List