Latur crime news – किनगावात पुन्हा चोरी, दोन दुकानांचे शटर तोडून अडीच लाख लुटले

Latur crime news – किनगावात पुन्हा चोरी, दोन दुकानांचे शटर तोडून अडीच लाख लुटले

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे चोरीचे सत्र सुरुच असून शनिवारी भल्या पहाटे येथे दोन दुकानांचे शटर तोडून अडीच लाख लुटल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही काळापासून अवैध वाहतूक, अवैध धंद्यांसह चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिक, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे किनगावातील सावरकर चौकात असणाऱ्या ‘श्री संत तुकाराम किराणा एजन्सी’चे शटर सळईने तोडून चोरट्यांनी आत प्रवेश मिळवला आणि खरेदीसाठी ठेवलेले अडीच लाख रुपये लंपास केले. याच चौकातील अहमदपूर-अंबाजोगाई रोडवरील ‘राधिका मेडिकल आणि जनरल स्टोअर्स’चे कुलूप तोडून टॉनिकच्या बाटल्या, मलम बॉक्स, बॉडी स्प्रेच्या बाटल्या, ऑल आउट मच्छर लिक्विड व मशीनसह गल्ल्यातील चिल्लरवरही चोरट्यांनी हात साफ केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;