गुरुचरण सिंग बेपत्ताप्रकरणी पोलीस पोहोचले ‘तारक मेहता..’च्या सेटवर; कलाकारांची केली चौकशी

गुरुचरण सिंग बेपत्ताप्रकरणी पोलीस पोहोचले ‘तारक मेहता..’च्या सेटवर; कलाकारांची केली चौकशी

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत रोशन सिंग सोढीची भूमिका साकारलेला अभिनेता गुरुचरण सिंग 22 एप्रिलपासून बेपत्ता आहे. तो कुठे आहे आणि कोणत्या अवस्थेत आहे, याबद्दलची माहिती अद्याप पोलिसांना मिळाली नाही. गेल्या काही दिवसांपासून गुरूचरणचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिसांची एक टीम काम करत आहे. याप्रकरणी आता दिल्ली पोलीस मुंबईतील फिल्म सिटीमध्ये पोहोचले आहेत. फिल्म सिटीमध्ये ‘तारक मेहता..’ या मालिकेचा सेट आहे. त्यामुळे सेटवरील सहकलाकारांशी चौकशी करण्यासाठी ते तिथे पोहोचले आहेत. गुरुचरणविषयी माहिती मिळवण्यासाठी त्यांनी ‘तारक मेहता..’च्या कलाकारांची चौकशी केली.

‘तारक मेहता..’च्या सेटवर पोहोचले पोलीस

“या आठवड्यात दिल्ली पोलीस आमच्या मालिकेच्या सेटवर पोहोचले होते आणि त्यांनी गुरुचरण सिंगशी संपर्कात असलेल्या कलाकारांची चौकशी केली. प्रत्येकाने पोलिसांच्या चौकशीमध्ये सहकार्य केलं. त्याचप्रमाणे मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसकडून गुरूचरण यांचं मानधन थकविण्यात आल्याची चर्चा होती. मात्र हे पैसे खूप आधीच चुकवले गेल्याचं पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालं”, अशी माहिती सेटवरील सूत्रांनी ‘न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत दिली.

मालिकेच्या निर्मात्यांकडून स्पष्टीकरण

नीला फिल्म्स प्रॉडक्शनचे प्रमुख सोहिल रमाणी याविषयी म्हणाले, “चौकशीचा एक भाग म्हणून दिल्ली पोलीस मालिकेच्या सेटवर पोहोचले होते. गुरुचरण सिंग यांना आमच्याकडून कोणतेच पैसे देणं बाकी नाही हे त्यांच्या तपासात स्पष्ट झालं. तो लवकरात लवकर सापडावा अशी आमची इच्छा आहे. आम्ही पोलिसांच्या तपासात पूर्ण सहकार्य करत आहोत.” गुरूचरण हे दिल्लीत राहत असलेल्या त्यांच्या आईवडिलांना भेटण्यासाठी अनेकदा मुंबईहून तिथे जात असतात. मात्र शेवटच्या वेळी ते जेव्हा आईवडिलांना भेटायला गेले, त्यानंतर ते मुंबईला परतलेच नाहीत. बरेच दिवस त्याच्याशी संपर्क होत नसल्याने अखेर त्याच्या आईवडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

दक्षिण पश्चिम दिल्लीचे डीसीपी रोहित मीणा यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, “आम्ही आयपीसीच्या कलम 365 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आम्ही या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक टीम तयार केली आहे आणि आमची तांत्रिक टीम देखील या प्रकरणात काम करत आहे. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये गुरूचरण कुठेतरी चालत जाताना दिसतोय.”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;