निकालाच्या तारखा बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर होणार
दहावी-बारावीचा निकाल मे महिन्यातच लागणार असून निकालाच्या तारखा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर होणार आहेत. राज्य शिक्षण मंडळाने तसे पत्रकच जाहीर केले असून विद्यार्थी-पालकांनी निकालाच्या तारखांसंबंधी सोशल मीडिया अथवा अन्य माध्यमातून फिरणाऱया अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाने केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून विविध माध्यमे, व्हॉट्सअॅप समूहावर दहावी-बारावीच्या निकालाच्या तारखा व्हायरल होत आहे. मात्र विद्यार्थी, पालकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये. निकालाची खरी तारीख शिक्षण मंडळाच्या https://mahahsscboard.in या वेबसाईटवर लवकरच जाहीर केली जाईल, असे राज्य शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List