माजी नगरसेविका वृषाली नकाशे यांचे निधन

माजी नगरसेविका वृषाली नकाशे यांचे निधन

शिवसेनेच्या माजी नगरसेविका वृषाली नकाशे यांचे काल पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगी व दोन मुलगे असा परिवार आहे. शिवसेनेचे राजापूर- लांजा-साखरपा मतदारसंघाचे विधानसभा संपर्कप्रमुख अॅड. चंद्रप्रकाश नकाशे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या जाण्यामुळे स्थानिक जनतेत हळहळ व्यक्त होत आहे.

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वृषाली नकाशे यांनी स्वतःला झोकून देऊन जोगेश्वरी पूर्व विभाग पिंजून काढला होता. वैश्य सहकारी बँकेच्या त्या संचालिका होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शिवसेना नेते-खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते -आमदार अॅड. अनिल परब, शिवसेना नेते-आमदार सुनील प्रभू, उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले. सायंकाळी निघालेल्या अंत्ययात्रेत सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;