डॉक्टरी पेशाला डाग लागतोय, हायकोर्टाचे परखड मत; खुल्या गटाच्या शुल्कासह 50 हजारांचा दंड

डॉक्टरी पेशाला डाग लागतोय,  हायकोर्टाचे परखड मत; खुल्या गटाच्या शुल्कासह 50 हजारांचा दंड

चुकीची माहिती सादर करून वैद्यकीय शिक्षण घेतल्याने डॉक्टरी पेशाला डाग लागतो, असे परखड मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. नॉन क्रिमिलेअरचा लाभ घेण्यासाठी खोटी कागदपत्रे देणाऱया ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थिनीला खुल्या गटाचे शैक्षणिक शुल्क भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

न्या. अतुल चांदुरकर व न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. या विद्यार्थिनीला न्यायालयाने 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दंडाची रक्कम सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाला द्यावी, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

 

न्यायालयाचे आदेश

या विद्यार्थिनीचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले आहे. ती आता डॉक्टर आहे. या विद्यार्थिनीने नॉन क्रिमिलेअरचा लाभ घेऊन शुल्क भरले होते, मात्र तिला खुल्या वर्गातील विद्यार्थी म्हणून ग्राह्य धरावे. त्यानुसार शुल्कातील फरकाची रक्कम तिने भरावी. प्रवेश घेतल्यापासून पदवी होईपर्यंतच्या शुल्काची रक्कम तिने द्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

 

म्हणून कारवाई नाही

आपल्या देशात लोकसंख्येच्या तुलनेत डॉक्टरांची संख्या कमी आहे. याचिकाकर्त्या डॉक्टरची पदवी काढून घेतली तर सर्वसामान्यांचे नुकसान होईल. याने देशाचे नुकसान होईल. तिच्या पालकांनी केलेली चूक माफ करता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले.

 

उत्पन्न न दाखवल्याचा फटका

नॉन क्रिमिलेअरसाठी पती-पत्नीचे उत्पन्न सादर करणे आवश्यक असते. लुबानाच्या वडिलांनी केवळ त्यांचे उत्पन्न दाखवले. पत्नीला तलाक दिला आहे. मुलांच्या संगोपनासाठी एकत्र राहतो, असे सांगितले होते. त्यांनी पत्नीचे उत्पन्न दाखवले नाही, असा ठपका चौकशी समितीने ठेवला.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;