रेवन्ना यांचे सेक्स स्पँडल बाहेर काढणाऱया भाजप नेत्याला अटक
एनडीएचे लोकसभेचे उमेदवार प्रज्वल रेवन्ना यांचे सेक्स स्पँडल बाहेर काढणाऱया भाजप नेते जी. देवराजे गौडा यांना शुक्रवारी रात्री हिरियूर पोलिसांनी ताब्यात घेतले. जी. देवराजे गौडा यांच्याविरोधात एका 36 वर्षीय महिलेने लैंगिक छळाची तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी आयपीसी कलम 354 (अ), 354 (ब), 448, 504, 506, 34 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 2008 कलम 66 (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली. देवराजे गौडा यांच्यावर खासदार प्रज्वल रेवन्ना यांचे अनेक महिलांचे लैंगिक शोषण करतानाचे व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप आहे. मात्र हे आरोप देवराजे यांनी फेटाळले आहेत. यामागे काँग्रेसचा हात आहे, असाही त्यांचा दावा आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List