सावत्र आईपेक्षा 5 वर्ष मोठी अभिनेत्री, ब्रेकअपनंतर उद्योजकासोबत लग्न, घटस्फोटानंतर इतके अफेअर्स

सावत्र आईपेक्षा 5 वर्ष मोठी अभिनेत्री, ब्रेकअपनंतर उद्योजकासोबत लग्न, घटस्फोटानंतर इतके अफेअर्स

बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात. आता देखील अशा अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे जीची सावत्र आई तिच्यापेक्षा 5 वर्ष लहान आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री पूजा बेदी आहे. ‘जो जीता वही सिकंदर’ सिनेमामुळे प्रसिद्धी झोतात आलेली पूजा अनेक कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली. पूजा हिने 1991 पासून 1995 पर्यंत बॉलिवूडमध्ये काम केलं. पण अभिनेत्री तिच्या वादग्रस्त प्रकरणं आणि अफेअर्समुळे चर्चेत राहिली.

सिनेमांसोबतच पूजा हिने अनेक जाहिरातींमध्येही काम केलं. कामसूत्र कंडोम मोहिमेसाठी देखील पूजा हिची ओळख आहे. फक्त पूजा नाहीतर, तिचे वडील आणि अभिनेते कबीर बेदी देखील त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिले. कबीर बेदी यांनी वयाच्या 70 व्या वर्षी 43 वर्षीय परवीन दुसांजशी लग्न केलं.

पूजा बेदी सावत्र आई परवीन हिच्यापेक्षा 5 वर्ष लहान आहे. रिपोर्टनुसार, पूजा हिने देखील अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींना डेट केलं आहे. सर्वात आधी पूजा हित्या नावाची चर्चा आदित्य पंचोली याच्यासोबत झाली. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

आदित्य पंचोली याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर पूजा हिने उद्योजक फरहान फर्नीचर यांच्यासोबत लग्न केलं. लग्नाआधी दोघांनी एकमेकांना 3 वर्ष डेट केलं. 1994 मध्ये फरहान आणि पूजा यांनी लग्न केलं. लग्नानंतर पूजा हिने ओमार आणि आलिया यांना जन्म दिला.

मुलांच्या जन्मानंतर देखील दोघांमध्ये वाद सतत होऊ लागले. अखेर पूजा आणि फरहान यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2003 मध्ये पूजा आणि फरहान यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर देखील पूजा हिचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं.

फरहान यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर पूजा हिच्या आयुष्यात कोरियोग्राफर हनीफ फिलहाल याची एन्ट्री झाली. दोघांनी एकमेकांना 2 वर्ष डेट केलं. पण दोघांचं नातं देखील फार काल टिकलं नाही. त्यानंतर पूजा हिने ‘बिग बॉस 5′ दरम्यान आकाशदीप सहगल याला डेट करण्यास सुरुवात केली. पण दोघांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही..

पूजा हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, पूजाने 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विषकन्या’ सिनमेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण पूजा हिला अभिनेता आमिर खान स्टारर ‘जो जीता वही सिकंदर’ सिनेमातून प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली.

‘जो जीता वही सिकंदर’ सिनेमात पूजा हिने आमिर खानसोबत लिप लॉक सीनही केला आहे, ज्यानंतर ही अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात अडकली. या सिनेमानंतक अभिनेत्रीने लुटेरे आणि टेररमध्येही काम केलं. पूजाला अभिनयात ओळख मिळाली नाही पण आजही तिची गणना 90 च्या दशकातील बोल्ड अभिनेत्रींमध्ये केली जाते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;