करिश्मा कपूरचे मोठे भाष्य, म्हणाली, प्रेग्नंसीमध्ये करीना कपूरने जे केले ते..

करिश्मा कपूरचे मोठे भाष्य, म्हणाली, प्रेग्नंसीमध्ये करीना कपूरने जे केले ते..

बाॅलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. मात्र, लग्न झाल्यानंतर करिश्मा कपूर ही चित्रपटांपासून दूर गेली. संजय कपूर याच्यासोबत करिश्मा कपूरने 2003 मध्ये लग्न केले आणि त्यानंतर 2014 मध्ये यांचा घटस्फोट झाला. करिश्मा कपूर ही चित्रपटांपासून जरी सध्या दूर असली तरीही करिश्माची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. करिश्मा कपूर आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच दिसते. आता करिश्मा कपूर हिने अत्यंत मोठा खुलासा केलाय.

करिश्मा कपूर ही नुकताच एका कार्यक्रमात पोहचली होती. यावेळी तिने काही मोठे खुलासे केले. विशेष म्हणजे यावेळी करिश्मा कपूर ही बहीण करीना कपूर खान हिच्याबद्दल बोलताना दिसली. करिश्मा कपूर म्हणाली की, करीना हे तिचे पहिले बाळ आहे. हेच नाही तर करीना कपूर ही खूप जास्त मजबूत असल्याचे सांगतानाही करिश्मा दिसली.

करिश्मा म्हणाली, लहानपणापासूनच करीनाला माहिती आहे तिला काय हवे. माझ्या आजोबांसारखी तिची पर्सनालिटी आहे. फक्त हेच काय तर मी बेबो (करीना कपूर)ला माझे आदर्श मानते. कारण ती खूप म्हणजे खूप जास्त मजबूत आहे. तिने तिच्या दोन्ही प्रेग्नंसीच्या वेळी काम केले. पहिल्यांदाच असे बहिणीबद्दल जाहिरपणे बोलताना करिश्मा कपूर ही दिसली आहे.

करिश्मा कपूरच्या या बोलण्यावरून हे स्पष्ट दिसते की, दोन्ही बहिणींमध्ये खूप चांगले आणि मजबूत असे नाते आहे. हेच नाही तर दोघीही एकमेकींवर खूप प्रेम करतात. काही दिवसांपूर्वीच करीना कपूर ही करिश्मा कपूरच्या मुलीसोबत स्पाॅट झाली होती. करिश्मा कपूर ही घटस्फोटानंतर आपल्या दोन्ही लेकरांसोबत मुंबईतच राहते. घटस्फोटानंतर मुलगी आणि मुलाला एकटी करिश्मा कपूर सांभाळते.

काही दिवसांपूर्वीच करिश्मा कपूर आणि करीना कपूर या विदेशात चांगला वेळ घालवताना दिसल्या. करिश्मा कपूर हिने मोठा काळ गाजवला आहे. विशेष म्हणजे करिश्मा कपूर ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन देखील आहे. करिश्मा कपूर हिच्या पुनरागमनाची वाट सतत चाहते हे पाहताना दिसत आहेत. करिश्मा कपूरने आपल्या करिअरची सुरूवात प्रेम कैदी चित्रपटाने केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;