करीना कपूर हिच्या वादाच्या भोवऱ्यात, उच्च न्यायालयाकडून नोटीस, काय आहे प्रकरण?

करीना कपूर हिच्या वादाच्या भोवऱ्यात, उच्च न्यायालयाकडून नोटीस, काय आहे प्रकरण?

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर हिच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडपीठाने करीना कपूर हिला नोटीस बजावली आहे. करीना कपूर तिच्या पुस्तकामुळे चर्चेत आली आहे. ‘करीना कपूर प्रेग्नन्सी बायबल’ नावाच्या वादग्रस्त पुस्तकाबाबत नोटीस जारी करण्यात आली आहे. करीना कपूर हिच्या शिवाय, आदिती शाह भीमजियानी, ॲमेझॉन इंडिया, जुगरनॉट बुक्स आणि इतरांनाही नोटीस बजावली आहे. न्यायालयाने नोटीस बजावत उत्तर मागितलं आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 1 जुलै रोजी होणार असल्याची देखील माहिती मिळत आहे.

संबंधीत प्रकरणी सांगायचं झालं तर, जबलपूर सिव्हिल लाइनचे रहिवासी ख्रिस्तोफर अँथनी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ज्यामध्ये त्यांनी ‘करीना कपूर प्रेग्नन्सी बायबल’ या पुस्तकाद्वारे ख्रिश्चन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. सध्या सर्वत्र करीना कपूर हिच्यावर होत असलेल्या आरोपांची चर्चा रंगली आहे.

याचिकेद्वारे करीना कपूरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. करीना कपूर खान हिने लोकप्रियता मिळवण्याच्या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे, पुस्तकाचं मुखपृष्ठ देखील आक्षेपार्ह आहे, असंही सांगण्यात येत आहे.

‘करीना कपूर प्रेग्नन्सी बायबल’ पुस्तकाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने पुस्तकात प्रेग्नेंसी दरम्यान स्वतःला आलेले अनुभव मांडले आहेत. ज्यामध्ये तिने एकदा सेटवर बेशुद्ध झाल्याचे सांगितले आहे. अगदी गरोदरपणातही अभिनेत्री तिच्या सिनेमाचे सातत्याने शूटिंग करत होती, जिथे तिच्यासोबत ही घटना घडली.

‘करीना कपूर खान खान्स प्रेग्नेन्सी बायबल’ चे कव्हर लाँच झाल्यानंतर amazon मधील प्रथम क्रमांकाचा बेस्टसेलर म्हणून हे पुस्तक ट्रेंडिंग झालं होतं. सध्या सर्वत्र करीना  कपूर आणि तिच्या पुस्तकाची चर्चा रंगली आहे. आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

करीना कपूर हिने अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत लग्न केल्यानंतर दोन मुलांना जन्म दिला. अभिनेत्रीच्या पहिल्या मुलाचं नाव तैमूर अली खान असं आहे तर, दुसऱ्या मुलाचं नाव जेह अली खान असं आहे. अभिनेत्री कायम मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;