‘ही’ अभिनेत्री रेखा यांना स्वतःची दुसरी आई का म्हणतेय? नक्की काय आहे सत्य

‘ही’ अभिनेत्री रेखा यांना स्वतःची दुसरी आई का म्हणतेय? नक्की काय आहे सत्य

बॉलिवूडच्या एव्हर ग्रीन अभिनेत्री रेखा यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही चाहते रेखा यांचे सिनेमे तितक्याच आवडीने आणि आनंदाने पाहतात. रेखा आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्याा तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतात चर्चेत. आता देखील रेखा यांच्याबद्दल मोठी चर्चा रंगली आहे. रेखा यांना बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री दुसरी आई म्हणते. रेखा यांना आपली दुसरी आई म्हणणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आहे.

सांगायचं झालं तर, सोनाक्षी सिन्हा हिचं ‘हीरामंडी’ सीरिजमधील काम पाहिल्यानंतर रेखा यांनी सोनाक्षी हिचं कौतुक केलं. ‘हीरामंडी’ सीरिज पाहिल्यानंतर रेखा यांनी सोनाक्षी हिला स्वतःची मुलगी म्हटलं आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सोनाक्षी हिने यावर मोठा खुलासा केला.

सोनाक्षी म्हणाली, ‘याबद्दल विचार करते तेव्हा मी स्वतः हैराण होते. प्रचंड रंजक करणारी गोष्ट आहे. रेखा यांनी माझ्या आईला म्हटले, मी सोनाक्षी हिची दुसरी आई आहे. सोनाक्षी माझी मुलगी आहे. त्या माझ्यावर स्वतःच्या मुलीप्रमाणे प्रेम करतात.’ असं देखील सोनाक्षी म्हणाली.

सांगायचं झालं तर, सिन्हा कुटुंबासोबत रेखा यांचे खास संबंध आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम यांच्यासोबत रेखा यांचे खास नातं आहे. सोनाक्षी सिन्हा हिचे वडील आणि दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी रेखा यांच्यासोबत अनेक सिनेमांमध्ये काम केलं.
पण एक काळ असा आला जेव्हा शत्रुघ्न सिन्हा आणि रेखा यांच्यातील वाद टोकाला पोहोचले. ‘खून भरी मांग’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान शत्रुघ्न सिन्हा आणि रेखा यांच्यामध्ये काही मतभेद झाले होते. याबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांनी सत्य सांगत पत्नीमुळे पुन्हा रेखा यांच्यासोबत असलेली मैत्री पुन्हा घट्ट झाली. असं देखील शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते

रिपोर्टनुसार, ‘खून भरी मांग’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान झालेल्या मतभेदानंतर शत्रुघ्न सिन्हा आणि रेखा जवळपास 20 वर्ष एकमेकांसोबत बोलत नव्हते… एक काळ असा होता, जेव्हा शत्रुघ्न सिन्हा आणि रेखा यांनी चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं होतं. आता दोघे अभिनयापासून दूर असले तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;