रितेश देशमुख यांच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, स्मशानभूमीतील अभिनेत्याचा फोटो समोर

रितेश देशमुख यांच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, स्मशानभूमीतील अभिनेत्याचा फोटो समोर

बॉलिवूडमधून एक वाईट बातमी समोर येत आहे. दिग्दर्शक संगीत सिवन यांचं निधन झालं आहे. वयाच्या 61 व्या वर्षी संगीत सिवन यांनी अखेरचा श्वास घेतला. संगीत सिवन आणि अभिनेते रितेश देशमुख यांच्यामध्ये घट्ट मैत्री होती. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. संगीत सिवन यांच्या अंत्यसंस्कारासाठी अनेक सेलिब्रिटी स्मशानभूमीत पोहोचले होते. रितेश देशमुख देखील मित्राला शेवटचा निरोप देण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचले. सध्या त्यांचे स्मशानभूमीतील काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

रिपोर्टनुसार, संगीत सिवन यांच्या निधनाची माहिती मिळताच सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला. रितेश देशमुख यांनी देखील सोशल मीडियावर संगीत सिवन यांच्यासोबत खास फोटो पोस्ट करत दुःख व्यक्त केलं आहे. रितेश देशमुख यांच्या पोस्टवर देखील चाहते कमेंट करत दुःख व्यक्त करत आहेत.

 

 

संगीत सिवन यांच्यासाठी भावना व्यक्त करत रितेश देशमुख म्हणाले, ‘संगीत सिवन आता या जगात नाहीत ऐकून मी हैराण झालो. एक नवा कलाकार असल्यामुळे कोणी तरी आपल्यावर विश्वास ठेवणारा असायला हवा आणि त्यांनी तुम्हाला काम दिलं पाहिजे.. ‘क्या कूल है हम’ आणि ‘अपना सपना मनी मनी’ सिनेमासाठी संगीत सिवन यांचे आभार व्यक्त करु शकत नाही..’ असं देखील अभिनेता म्हणाला.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

 

हिंदी आणि मल्याळम सिनेमा जगतातील प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन आता आपल्यात नाहीत. ‘यमला पगला दीवाना-2’, ‘क्या कूल हैं हम’,’अपना सपना मनी मनी’ यांसारख्या अनेक सिनेमाचं दिग्दर्शन संगीत सिवन यांनी केलं आहे. आता त्यांच्या निधनामुळे कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

संगीत सिवन यांच्या निधनानंतर सेलिब्रिटी आणि चाहते सोशल मीडियच्या माध्यमातून दुःख व्यक्त करत आहेत. पण संगीत सिवन यांच्या निधनाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. संगीत सिवन यांचं निधन का आणि कसं झालं यावर कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;