शेतकऱ्यांना दिलासा…मात्र अवकाळी पाऊस फटका देणार…जाणून घ्या भेंडवळचे भाकीत
बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळमध्ये घट मांडणी करून त्यावरून वर्षभराचे भाकीत वर्तवण्यात येते. त्यात वर्षभरातील पर्जन्यमान, शेती, शेतकरी, देश, राज्य याबाबतचे विविध अंदाज वर्तवण्यात येतात. दरवर्षी ही भेंडवळची भविष्यवाणी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. अक्षय तृतीयेला सायंकाळी गावाबाहेरील शेतात घटमांडणी केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचे निरीक्षण करून भाकीत वर्तवण्यात येते.
भेंडवळ येथील घट मांडणीचे भाकीत जाहीर करण्यात आले आहे. त्यात शेतकऱ्यांना दिलासादायक भाकीत आहे. यावर्षी पाऊसपाणी चांगेल होणार असून पीक परिस्थिती सर्वसाधारण राहणार आहे. मात्र, पावसाळ्यापेक्षाही अवकाळी पाऊस जास्त होण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या दोन महिन्यात पावसाळा कमी राहील, तर नंतरच्या दोन महिन्यात भरपूर पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसाळ्यापेक्षाही अवकाळी पाऊस शेतकऱ्यांना फटका देण्याची शक्यता आहे. जून, जुलै हे महिने कमी पावसाचे असणार आहेत. तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
परकीय देशांपासून आपल्या देशाला कुठलाही धोका नाही. या घटमांडणीतून मागच्या वर्षी जे भाकित करण्यात आले होते ते 90 टक्के खरे झाले आहे. त्यामुळे या भाकीताकडे अनेकांचे लक्ष असते. यावर्षी पाऊस चांगला झाला तरी खरिपाची पिकं साधारण राहतील. तर रब्बीच्या हंगामात गव्हाचं पिक चांगले होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरवर्षी येथील घटमांडणीमधून राजकीय भाकितही केले जाते. मात्र यावर्षी आचारसंहिता असल्याने राजकीय भाकित वर्तवण्यात आलेले नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List