नगर जिल्ह्यातील पाणी योजनांचा आराखडा तयार करणार; जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची माहिती

नगर जिल्ह्यातील पाणी योजनांचा आराखडा तयार करणार; जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची माहिती

जिह्यातील काही पाणीयोजना वीजबिल थकल्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे बंद पडल्या आहेत. त्याचा परिणाम संबंधित गावांना पाणीपुरवठा करण्यावर होत आहे. त्यामुळे निवडणुका संपल्यावर जिह्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेकडील पाणी योजनांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. यामुळे संबंधित योजनांकडे काय अडचणी आहेत, या समोर येऊन भविष्यात येणाऱया अडचणी सोडवता येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली.

जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, ‘सध्या जिह्यात 296 टँकरद्वारे 278 गावे आणि 1500 वाडय़ा-वस्त्यांवरील लोकांची तहान भागवण्यात येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही परिस्थिती बरी असली तरी काही वर्षांपूर्वी यापेक्षा अधिक टँकर जिह्यात सुरू होते. जिह्यात काही भागात चारा टंचाई होणार असल्याचा पशूसंवर्धन विभागाचा अहवाल होता. मात्र, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. जिल्हा प्रशासनाने टँकर भरण्याचे बंद पडलेले पाण्याचे स्रोत कार्यान्वित करून घेतले आहे. यामुळे पाण्याचे टँकर वेळेत भरण्यास मदत होत असून, यामुळे पाण्याच्या नियोजित खेपा होण्यास मदत होत आहे. यांसह टंचाईवर मात करण्यासाठी 64 ठिकाणी विहिरी आणि कूपनलिका अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सध्यातरी पाण्याचा काटकसरीने वापर महत्त्वाचा आहे.

सध्या निवडणुकीचा कालावधी सुरू असला तरी जिल्हा प्रशासनाचे जिह्यातील पाणीटंचाईकडे जाणीवपूर्वक लक्ष असून, आठ दिवसांतून एकदा टंचाईबाबत आढावा घेण्यात येऊन नागरिकांना पाणी आणि चारा उपलब्ध करण्यासंदर्भात नियोजन सुरू असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी स्पष्ट केले. जिह्यातील बंद पडलेल्या प्रादेशिक पाणी योजनांकडे त्यांचे लक्ष वेधले असता, टंचाई आणि निवडणुका संपल्यावर जिह्यातील जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील योजनांचा आरखडा तयार करण्याचा मानस जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला. यात संबंधित योजना किती गावांसाठी आहे, योजनेचे हस्तांतरण झाले की नाही. योजनेच्या वीजबिलाची स्थिती यांसह अन्य बाबींचा त्या आराखडय़ात समावेश करण्यात करण्यात येणार आहे. जेणेकरून संबंधित पाणी योजना कशा प्रकारे सुरू ठेवता येईल, यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सालीमठ यांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;