मैं सस्ता दिखता है क्या?, ऑरी याची मिनिटांची कमाई लाखोंमध्ये, इनकम सोर्स जाणून भारतीच्या भुवया उंचावल्या

मैं सस्ता दिखता है क्या?, ऑरी याची मिनिटांची कमाई लाखोंमध्ये, इनकम सोर्स जाणून भारतीच्या भुवया उंचावल्या

ओरहान अवात्रामणी उर्फ ऑरी सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झालेल्यांपैकी एक आहे. कोणत्याही सेलिब्रिटीने पार्टी किंवा इतर कोणत्या गोष्टीचं आयोजन केसं असेल तर ऑरी त्याठिकाणी असतोच… शिवाय सेलिब्रिटींसोबत स्वतःच्या सिग्नेचर पोजमध्ये काढत असलेल्या फोटोंमुळे देखील ऑरी कायम चर्चेत असतो. ऑरी फक्त सेलिब्रिटींच्या पार्टीमध्येच नाही तर, अंबानी यांच्या कार्यक्रमांमध्ये देखील उपस्थित असतो. फक्त सेलिब्रिटींच्या पार्ट्यांमध्ये उपस्थित राहून नाही इतर मार्गांनी देखील ऑरी लाखोंची कमाई करतो.

आतापर्यंत ऑरी याने अनेकदा त्याच्या कामांबद्दल सांगितलं आहे. पण तरी देखील ऑली याला कायम त्याच्या कमाई बद्दल विचारलं जातं. नुकताच भारती सिंग हिने देखील पॉडकास्टमध्ये ऑरी याला त्याच्या कमाईबद्दल विचारलं. तेव्हा ऑरीने स्वतःबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या.

भारती ऑरी याला विचारते, ‘महागडा आहेस तू…’ यावर ऑरी म्हणतो, ‘मैं सस्ता दिखता है क्या?’ पुढे हर्ष ऑरी याला विचारतो एका फोटोसाठी किती रुपये घेतोस. ऑरी याने सांगितलेला आकडा थक्क करणारा आहे. ऑरी एका फोटोसाठी 20 लाख रुपये घेतो. सध्या सर्वत्र ऑरी याची चर्चा रंगली आहे.

पुढे ऑरी म्हणतो, ‘जर कोणी चाहता माझ्याकडे सेल्फीसाठी आला तर, मी त्यांच्याकडून पैसे घेत नाही. पण कोणी माझ्याकडे फोटो काढण्याची मागणी करत असेल तर मी 20 लाख रुपये घेतो. शिवाय कोणत्या शोमध्ये किंवा कोणत्या कार्यक्रमात जाण्यासाठी मी 25 लाख रुपये चार्ज करतो. असं देखील ऑरी म्हणाला.

‘बिग बॉस 17’ मध्ये देखील ऑरी याने केला होता मोठा खुलासा…

याआधी ऑरी याने अभिनेता सलमान खान याला ‘बिग बॉस 17’ मध्ये स्वतःच्या कमाईबद्दल सांगितलं होतं. ऑरी याला पर्टीमध्ये जाण्याचे नाही तर, फोटो काढण्याचे पैसे मिळतात. पार्टीमध्ये काढलेल्या फोटोचं ऑरी याला 25 ते 30 लाख रुपये मिळतात.
ऑरी म्हणाला होता, ‘मला पार्टीमध्ये जाण्याचे पैसे मिळत नाहीत. लोकं मला बोलतात की आमच्या लग्नात ये. माझ्यासोबत अशी पोज दे.. माझ्या पत्नीसोबत अशी पोज दे.. मुलांसोबत फोटो पोस्ट कर… ज्यासाठी मला 25 ते 30 लाख रुपये मिळतात.’

सांगायचं झालं तर, बॉलिवूडच्या नामांकित सेलिब्रिटींपासून अंबानींपर्यंत.. ऑरीसोबत फोटो काढले नाहीत अशी व्यक्ती सापडणं अवघड झालंय. सुरुवातीला फक्त जान्हवी कपूर, निसा देवगण, सारा अली खान यांसारख्या स्टारकिड्ससोबत दिसणारा ऑरी काही दिवसांपूर्वी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगमध्येही दिसला. ऑरी हा बॉलिवूडमधल्या अनेक स्टारकिड्सचा खास मित्र आहे. स्टारकिड देखील ऑरीसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;